corona update: Akola: आज एकूण ३७६ नवे पॉझिटिव्ह; सायंकाळी ३ जणांचे मृत्यू

              *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २८ मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १५६८*
*पॉझिटीव्ह-२५८*
*निगेटीव्ह-१३१०*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ) १७५+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ८३+ रॅपिड ११८=३७६


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ८३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २८ महिला व ५५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील बार्शीटाकळी व रामदासपेठ येथील प्रत्येकी पाच, गोयका नगर व मलकापूर येथील प्रत्येकी चार, कौलखेड, डाबकी रोड व राऊतवाडी येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, गायगाव, जूने शहर, महान, कृषी नगर, जठारपेठ, अशोक वाटीका, गायगाव व पिंपळखुटा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कॉग्रेस नगर, नांदखेड, खदान, अकोट, दहिहांडा, मारोती नगर,गंगा नगर, श्रीहरी नगर, हिरपूर, पुरणखेड, समता नगर, खरप ढोरे, स्टेशन एरिया, काटेपुर्णा, सलू बाजार, तळेगाव, दगडपारवा, सहकार नगर, तापडीया नगर, विकास नगर, रामकृष्ण नगर, रणपिसे नगर, केळपाणी, सिटी कोतवाली, रेणूका नगर, बलोदे लेआऊट, खोलेश्वर,  शिवसेना वसाहत, शिवाजी नगर, रजपूतपुरा, गुलजारपुरा, रिधोरा, केशव नगर, चोहट्टा बाजार, नेरधामणा, रामनगर, जीएमसी व कैलास टेकडी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज सायंकाळी तिघांचा मृत्यू झाला. त्यात कैलास टेकडी, अकोला येथील ६३ वर्षीय महिला रुग्ण असून या महिलेस दि. २८ रोजी मृतावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तर अन्य ३५ वर्षीय अनोळखी पुरष रुग्णास दि. २८ रोजी मृतावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तसेच गंगानगर, अकोला येथील ६८ वर्षीय महिला रुग्णाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. या महिलेस दि. २३ रोजी दाखल करण्यात आले होते.


 
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, हॉटेल स्कायलार्क येथून आठ, इंद्रा हॉस्पीटल येथून दोन, सहारा हॉस्पीटल येथून एक, खैर उम्मत हॉस्पीटल येथून दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील दोन, युनिक हॉस्पीटल येथील तीन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील सहा, बिहाडे हॉस्पीटल येथून नऊ, अकोला ॲक्सीडेंट येथून दोन, यकिन हॉस्पीटल येथून तीन, नवजीवन हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, ओझोन हॉस्पीटल येथून पाच, तर होम आयसोलेशन येथील ४२४, असे एकूण ५२५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२२२५८+४७६५+१७७= २७२००*
*मयत-४४६*
*डिस्चार्ज-२०२६०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६४९४* 

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या