corona update: Akola: आज दिवसभरात ३९१ पॉझिटिव्ह; २ रुग्णांचा मृत्यू

            *कोरोना अलर्ट*


*आज बुधवार दि. १० मार्च २०२१ रोजी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल- १९५१* 
*पॉझिटीव्ह-३०५*
*निगेटीव्ह-१६४६*



*आजचे एकूण पॉझिटिव्ह-*
आरटिपीसीआर(सकाळ)२३५+ आरटिपीसीआर(सायंकाळ) ७०+ रॅपिड ८६=३९१



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी ७० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ११ महिला व ५९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील दहा,  जीएमसी व हिवरखेड येथील प्रत्येकी सहा, केडिया प्लॉट येथील चार, डाबकी रोड, तापडिया नगर व मोठी उमरी  येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, अनीकट, शास्त्रीनगर, खदान, रामदासपेठ, केशवनगर, थार  व कारला येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित किर्ती नगर, अकोट फाइल, पोळा चौक, मोहम्मद अली चौक, पंचशील नगर, बाळापूर नाका, सुधीर कॉलनी, चांदुर ,भिमनगर, केला प्लॉट, सल्पी,  कोठारी बाजार, गुरुदेव नगर ,महाकाली नगर ,रजपुतपुरा, रतनलाल प्लॉट, भांबेरी, शिवर व शिवणी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.



दरम्यान आज दोंघाचा मृत्यू झाला. त्यात रेणूका नगर, अकोला येथील रहिवासी असलेला ५५  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. १ रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य महसूल कॉलनी, अकोला येथील रहिवासी असलेली ७६ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ५ रोजी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ५५, युनिक हॉस्पीटल येथून दोन, नवजीवन हॉस्पीटल येथून चार, ग्रामीण आरोग्य बार्शीटाकली येथून एक, आयकॉन हॉस्पीटल येथून १०,  बिहाडे हॉस्पीटल येथून सहा, अवघाते हॉस्पीटल येथून एक, स्कायलार्क हॉटेल येथून ११,  सुर्यचंद्र हॉस्पिटल येथून एक, बॉईज होस्टेल अकोला येथून १२, सहारा हॉस्पिटल येथून दोन, आधार हॉस्पीटल मूर्तिजापूर येथून चार, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, कोविड  केअर सेंटर बाळापूर येथून एक, उपजिल्हा आरोग्य मूर्तिजापूर येथून एक, कोविड  केअर सेंटर तेल्हारा येथून तीन, कोविड  केअर सेंटर अकोट येथून एक, हॉटेल रिजेन्सी येथुन तीन, तर होम आयसोलेशन येथून २०० अशा एकूण ३२१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 
*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६३७९+३३३५+१७७=१९८९१*
*मयत-३९१*
*डिस्चार्ज-१४६६३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ४८३७*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या