corona update: Akola: आज सकाळी १७५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह; रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट मध्ये ११८ पॉझिटीव्ह

                  *कोरोना अलर्ट*

*आज रविवार दि. २८ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- १००८* 
*पॉझिटीव्ह-१७५*
*निगेटीव्ह-८३३*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १७५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ५१ महिला व १२४ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा व पारस येथील प्रत्येकी ११, पलसखेड व मलकापूर येथील प्रत्येकी आठ, कौलखेड येथील सहा, गोरक्षण रोड, शिवर व जठारपेठ येथील प्रत्येकी पाच, खडकी, डाबकी रोड, कुंभारी, एमआयडीसी व गोकूल कॉलनी येथील प्रत्येकी चार, शिवसेना वसाहत, दानापूर, जीएमसी, अकोट, येवता, लहान उमरी, मोठी उमरी व जवाहर नगर येथील प्रत्येकी तीन, गाडगे प्लॉट, हरिहर पेठ, शास्त्री नगर, नवरंग सोसायटी, गिता नगर, वाशिम बायपास, बार्शीटाकळी, तुकाराम चौक, पातूर, सिंधी कॅम्प, बाळापूर व व्हीएचबी कॉलनी येथील  प्रत्येकी दोन. 



उर्वरित मडकेवाडी, हमजा प्लॉट, चाँदखॉ प्लॉट, देशपांडे प्लॉट, आयकॉन जवळ, गणपती गल्ली, खरप, मुर्तिजापूर, वरखेड, खिरपूर बु., टाकळी, ताजनगर, इंद्रायणी कॉलनी, हिंगणा, आरटीओ रोड, श्रद्धा नगर, रामदासपेठ, राधाकिसन प्लॉट, गड्डम प्लॉट, आदर्श कॉलनी, जूने शहर, स्नेहा नगर, खोलेश्वर,माणिक टाँकीज, बोरगाव मंजू, बाबुळगाव जहॉगीर, वाजेगाव, नया अंदुरा, अमंतपूर, विजोरा, गुडधी, बिर्ला रेल्वे क्वॉटर, पनखेड, तापडीया नगर, चांदुर, सावंतवाडी, कंवरनगर, नयागाव, बाळापूर नाका, लेडी हार्डींग, बाबुळगाव, बाळापूर रोड, वनी, पिंपळखुटा, हिंगणा, जैन चौक, पंचशिल नगर व तारफैल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ११८ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२२१७५+४७६५+१७७= २७११७*
*मयत-४४३*
*डिस्चार्ज-१९७३५*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ६९३९*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या