corona update: Akola: आज दिवसभरात ३३२ नवे पॉझिटिव्ह, सायंकाळी २ मृत्यू

           *कोरोना अलर्ट*

*आज मंगळवार दि. २३ मार्च २०२१ रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-१२२७*
*पॉझिटीव्ह-२३५*
*निगेटीव्ह-९९२*



 *आजचे एकुण पॉझिटीव्ह*
आरटिपीसीआर (सकाळ) १३१+ आरटिपीसीआर (सायंकाळ) १०४+ रॅपिड ॲन्टीजेन ९७ = ३३२ 



*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी १०४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात २४ महिला तर ८० पुरुष रुग्णांचा समावेश आहे. त्यात बार्शी टाकळी व कौल खेड येथील प्रत्येकी सहा, मलकापूर, जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी चार,  पातूर, सावरखेड, खडकी, शिवनी, गितानगर, जठारपेठ, मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, टेलिफोन कॉलनी, गजाननगर, रतनलाल प्लॉट, केशवनगर, डाबकी रोड, गोरक्षण रोड, म्हैसांग, बोरगाव मंजू, मुर्तिजापूर, सस्ती, रामदासपेठ, पिंपळखुटा आणि दगडपारवा येथील प्रत्येकी दोन तर शास्त्री नगर, अकोट, भंडारज, खानापूर, चांदूर, कॉग्रेस नगर, वनोजा, बाळापूर, न्यु तापडीया नगर, जुने शहर, शिरसोली,  कोठारी वाटिका, लहरिया नगर, रणपिसे नगर, दुर्गाचौक, एसडीओ ऑफिस, जागृती विद्यालय जवळ, आपातापा, कान्हेरी, महागाव, डोनद बु., खरप, गोकुळ कॉलनी, शेलू हातोला, आंबेडकर नगर,  आदर्श कॉलनी,  संतोष नगर, पंचगव्हाण,  जीएमसी, लाखनवाडा, रामनगर. रजपूतपुरा, तारफैल,  राऊतवाडी, जुने आर टी ओ ऑफिस, दगडी पुल, तोष्णिवाल ले आऊट  येथील प्रत्येकी एक या प्रमाणे  रहिवासी आहेत.



दरम्यान आज सायंकाळी खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. त्यात अकोट येथील  ४९ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. या रुग्णास दि.२० रोजी दाखल करण्यात आले होते. अन्य रुग्ण तर गंगानगर येथिल ७३ वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि.१५ रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. 



दरम्यान आज सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४१ जणांना, होम आयसोलेशन मधील ४०० जणांना तर  कोविड केअर सेंटर तेल्हारा येथिल सहा, कोविड केअर सेंटर बाळापूर येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील १२, कोविड केअर सेंटर बार्शी टाकळी येथील १२,  सूर्यचंदर हॉस्पिटल येथील दोन, अकोला ॲक्सिडेन्ट हॉस्पिटल येथील  तीन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील सहा, आयकॉन हॉस्पिटल येथील आठ, युनिक हॉस्पिटल येथील  तीन, सहारा हॉस्पिटल येथील तीन, अवघाटे हॉस्पिटल येथील तीन, बिहाडे हॉस्पिटल येथील तीन, नवजीवन हॉस्पिटल येथील  नऊ,  समाज कल्याण वस्तीगृह येथील १२,  स्कायलार्क हॉटेल येथील पाच, ओझोन हॉस्पिटल येथील  पाच, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, देवसर हॉस्पिटल येथील एक तर आरकेटी हॉस्पिटल येथील सहा अशा एकूण ५४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.   



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-२०७८८+४१४३+१७७=२५१०८*
*मयत-४३०*
*डिस्चार्ज-१८७१३*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५९६५*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या