corona update: Akola: आज सकाळी २५७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह ; ३ मृत्यू

               *कोरोना अलर्ट*

*आज शुक्रवार दि. १२ मार्च २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*


*प्राप्त अहवाल- १७२९* 
*पॉझिटीव्ह-२५७*
*निगेटीव्ह-१४७२*


*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी २५७ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७७ महिला व १८० पुरुषांचा समावेश आहे. त्यातील तेल्हारा येथील २३, अकोट येथील २१, जीएमसी येथील १५, खदान येथील ११, डाबकी रोड व पिंपळगाव येथील प्रत्येकी नऊ, मलकापूर येथील सहा, कौलखेड, गिता नगर, मोठी उमरी व बाळापूर येथील प्रत्येकी पाच, दानोरी, अनिकेत, गणेश नगर, अकोली जहाँगीरी व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी चार, आळसी प्लॉट, सूकोडा, खडकी, जठारपेठ,गोरक्षण रोड, अकोट फैल, फिरदोस कॉलनी, गायत्री नगर व तुकाराम चौक येथील प्रत्येकी तीन, देशमुख फैल, तारफैल, गुलजारपुरा, सांगवी खुर्द, शंकर नगर, जीएमसी हॉस्टेल, पोलिस हेडक्वॉटर, कृषी नगर, तापडीया नगर, लहान उमरी, गोपालखेड, ताकवाडा, गोरेगाव बु., बार्शीटाकळी, सिंधी कॅम्प, पोळा चौक, सिव्हील लाईन, शिवाजी पार्क, रतपूतपुरा, निमकर्दा व सातव चौक येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कुबा मशिद, दुर्गा नगर, अंबिका नगर, रणपिसे नगर, माधवनगर, दत्ता कॉलनी, निमवाडी, व्हीएचबी कॉलनी, आनंद नगर, मित्रा नगर, जूने शहर, सिंधी कॅम्प, नया अंदुरा, वस्तापूर, एमआयडीसी, सरस्वती नगर, पंचशील नगर,  कोठारी वाटीका, लक्ष्मी नगर, रामकृष्ण नगर, गौतम नगर, मुझ्झफर नगर, रुख्मिनी नगर, अकोली खुर्द, माधव नगर, दापूरा, रहानखेड, आपातापा, शिवनी, कवर नगर, पळसोबढे, कुरणखेड, चांदुर, जूने आरटीओ रोड, हिंगणा, अमांख्या प्लॉट, मोमीनपुरा, रणपिसे नगर, राऊतवाडी, केशव नगर, गजानन नगर, वानखडे नगर, भिमनगर, खोलेश्वर, दगडीपुल, चांडक प्लॉट, गजानन नगर, लोथखेड, करोडी, खेताननगर, सांगवी बाजार, उमरी, बोरगाव वऱ्हाडे व न्यु तापडीया नगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज तिघांचा मृत्यू झाले. त्यात तेल्हारा येथील रहिवासी असलेला ५५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ६ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, विठ्ठल नगर कौलखेड येथील रहिवासी असलेली ८२ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ११ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, तर कानशिवणी बोरगाव मंजू येथील रहिवासी असलेली ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. २८ फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आले होते.




दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ३५ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६९१२+३४३९+१७७=२०५२८*
*मयत-३९६*
*डिस्चार्ज-१४९९४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव पॉझिटीव्ह)- ५१३८*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या