Corona update: Akola: सावधान: आज दिवसभरात 473 पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू



 

भारतीय अलंकार 24

अकोला: आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1813 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1396 अहवाल निगेटीव्ह तर 417 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 335  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला तर तीन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.12) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 56 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 21062(17390+3495+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 130050 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 127607 फेरतपासणीचे 378 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2065  नमुने होते. आजपर्यंत एकूण 129833 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 112443 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 



417 पॉझिटिव्ह


आज सकाळी ३१६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ९१ महिला व २२५ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील डाबकी रोड व तेल्हारा येथील प्रत्येकी १८, मोठी उमरी येथील १०,  गिता नगर येथील नऊ, आलेगाव येथील आठ, कौलखेड, सिंधी कॅम्प, शास्त्री नगर व पातूर येथील प्रत्येकी सात,  मुर्तिजापूर येथील सहा, जीएमसी, रिधोरा, अकोट फैल, गोरक्षण रोड, खदान, आदर्श कॉलनी, वाशिम बायपास, रामदासपेठ, मलकापूर, रणपिसे नगर, बाळापूर व बोरला येथील प्रत्येकी पाच, खडकी येथील  चार, गांधी रोड, कळबेंश्वर, खोलेश्वर, किर्ती नगर, राम नगर, सातरगाव, अकोट, लहान उमरी, खेतान नगर, आळशी प्लॉट, माना, चोहट्टा बाजार, जूने शहर येथील प्रत्येकी तीन, तारफैल, देशमुख फैल, माधव नगर, गीरी नगर, गुडधी, हमजा प्लॉट, हिवरखेड, मेहरे कॉलनी, मुकूंद नगर, रजपूत पुरा, जाजू नगर, हरिहर पेठ, जठारपेठ, घुसर, शिवाजीनगर,  बोरवाकडी व  कुरुम येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित  निबंध प्लॉट, राऊतवाडी, शिवणी, चोहगाव, शिवर, कान्हेरी सरप, द्वारका नगर, मेहबुब नगर, चिखलपुरा, शंकर नगर, अशोक नगर, पंचशील नगर, तोष्णीवाल लेआऊट, गुलजारपुरा, हिंगणा फाटा, खरप, बार्शिटाकळी, कैलास टेकडी, जामठी बु., न्यु खेतान नगर, चांदुर, सूधीर कॉलनी, रघुवीर नगर, मारोती नगर, इंद्रा नगर, शिवसेना वसाहत, जयहिंद चौक, मांजरी, पूनम हॉटेल, तुकाराम चौक, सावत्रा चाळ, लंकडगंज, गंगा नगर, नयागाव, बरलिंगा, आपातापा, भिम नगर, सोनटक्के प्लॉट, अपोती, शनी मंदीर मागे, बापू नगर, कल्याणवाडी, भागवतवाडी, महाकाली नगर, भगीरथवाडी, प्रेम नगर,  लोकमान्य नगर, गाडगे नगर, पोलिस हेडक्वॉटर, चिचोंडी, गोडबोले प्लॉट,  मोरगाव भाकरे, पतनवथल, लखनवाडा, स्टेशनरोड, दिपक चौक, मुर्तिजापूर रोड, तापडीया नगर, हिंगणारोड, दुधडेअरी समोर, गड्डम प्लॉट, मनकर्णा प्लॉट, राजंदा, अखातवाडा, प्रशासन विभाग, कृषि विभाग, जीएमसी हॉस्टेल, गजानन नगर, देवि पोलिस, आरटीओ रोड, न्यु राधाकिसन प्लॉट, अनिकेत पोलिस लाईन, जय मातादि चौक, सरकारी गोडाऊन, अडगाव, हातरुण, बोकराबाद, चान्नी चौकी,  गणेश गिरी, न्यु भिम नगर, दुर्गा चौक व जैन चौक येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 




आज सायंकाळी १०१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३५ महिला व ६६ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील सिंधी कॅम्प व डाबकी रोड येथील प्रत्येकी सहा, जठारपेठ, आदर्श कॉलनी व खडकी येथील प्रत्येकी पाच, रामदासपेठ व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, गीता नगर, लहान उमरी, मलकापूर व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, राजपूत पुरा, हिंगणा, तोष्णीवाल लेआऊट, संतता नगर, सुधीर कॉलनी, गायत्री नगर, पिंजर, बोरगाव वऱ्हाडे व सातव चौक येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित मालीपुरा, जूने शहर, जयहिंद चौक, पोलिस हेडक्वॉर्टर, गोकर्णकार, खोलेश्वर, वानखेडे नगर, अंजनगाव, कपिलवास्तू, केशवनगर, डॉक्टर कॉलनी, चोहोगाव, बार्शिटाकळी, कापशी रोड, रणपिसे नगर,बाळापूर, डीएचओ ऑफिस, काँग्रेस नगर, तुकाराम चौक, बालाजी नगर, पातूर, डोंगरगाव, खेडकर नगर, जूने आरटीओ रोड, किर्ती नगर, जोगलेकर प्लॉट, अनिकेत, अपोती, वृंदावन नगर, शिवाजी नगर, गुलझारपुरा, तापडीया नगर, तौली पंच, सैद, जवाहर नगर व तेल्हारा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.


दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 56 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी. दरम्यान आज दिवसभरात सकाळी आरटीपीसीआर च्या चाचण्यात 316, सायंकाळी आरटीपीसीआर च्या चाचण्यात 101 तर रॅपिड चाचण्यात 56 असे एकूण 473 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.




335 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ४४, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून पाच, नवजीवन हॉस्पीटल येथून ११, हॉटेल रिजेन्सी येथून तीन, सहारा हॉस्पीटल येथील एक, युनिक हॉस्पीटल येथील चार, बाईज हॉस्टेल अकोला येथून २८, हॉटेल स्कायलार्क येथून ११, कोविड केअर सेंटर तेल्हारा येथून दोन, हेंडज कोविड केअर सेंटर मुर्तिजापूर येथून १८, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, कोविड केअर सेंटर पास्टूल अकोट येथून १९, ओझोन हॉस्पीटल येथून तीन, तर होम आयसोलेशन येथील १८० जणांना असे एकूण ३३५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती  जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.




तिघांचा मृत्यू


दरम्यान आज सांयकाळी तिघांचा मृत्यू झाला. त्यात बाळापूर येथील रहिवासी असलेली ७० वर्षीय महिलाचा मृत्यू झाला. त्यांना दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, तर अन्य रजूपतपुरा, अकोला येथील रहिवासी असलेला 85 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांना दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, तसेच आपातापा रोड, अकोला येथील रहिवासी असलेला 61 वर्षीय पुरुषाचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना दि. 10 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली.




5034 जणांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवालाची संख्या 21062(17390+3495+177)  आहे. त्यातील 400 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 15628 आहे. तर सद्यस्थितीत 5034  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या