Corona impact: Akola: रस्त्यावर फिरणाऱ्या तीन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर गुन्हे दाखल

 



भारतीय अलंकार 24

अकोला: कोविड पॉझिटिव्ह असूनही होम आयसोलेशन मध्ये राहण्याचा सल्ला दिल्यानंतर देखील बाहेर फिरताना आढळलेल्या तिघा रुग्णा विरुद्ध आज महानगर पालिकेच्या पथकाने गुन्हे दाखल केले. नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा अधिनियम  व भादंवि कलम १८८ अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकारची कारवाई यापुढेही करण्यात यावी जेणे करुन पॉझिटीव्ह रुग्ण बाहेर फिरता कामा न नये, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे दिले.





यासंदर्भात आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी पापळकर यांनी आढावा घेतला.  त्यावेळी ही माहिती देण्यात आली. 





या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, मनपा आयुक्त निमा अरोरा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा उपायुक्त जावळे, डॉ. श्यामसुंदर शिरसाम, डॉ. अस्मिता पाठक आदी उपस्थित होते.





यावेळी माहिती देण्यात आली की, शहरातील रहिवासी भागात तीन रुग्ण  पॉझिटिव्ह असून व होम आयसोलेशन सुचविण्यात आले असून सुद्धा बाहेर फिरताना आढळले. मनपाच्या पथकाने ही कारवाई केली. 



संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात यावी

यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी सांगितले की, एका पॉझिटीव्ह रुग्णामागे किमान २० अतिजोखमीचे व १० कमी जोखमीचे संपर्कातील व्यक्तींची चाचणी करण्यात यावी. तसेच होम आयसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णांवर लक्ष ठेवणे. त्यांच्या प्रकृतीची वेळोवेळी तपासणी करणे व रुग्ण घेत असलेल्या उपचारांबाबत पाठपुरावा करणे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी मनपाच्या फिरत्या पथकांना दिले. तसेच अधिकाधिक लोकांच्या चाचण्या वाढवा, असेही निर्देश दिले.



त्रिसूत्रीचा अवलंब करावा

दरम्यान नागरिकांनी मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. विनाकारण घराबाहेर फिरु नये व सुरक्षित राहावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी पापळकर यांनी केले आहे.

टिप्पण्या