- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सातत्याने देत आहेत प्रामाणिकतेचा परिचय
भारतीय अलंकार 24
अकोला: मागील एक वर्षा पासून अकोला शहरात निर्माणधीन प्रमुख रस्ते व उड्डाणपूल यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. गजबजलेल्या चौकात हजर राहून ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजवावे लागते.
अकोला हे महाराष्ट्रातील पहिल्या पाच प्रदूषित शहरात मोडत असतानाच वाहतूक पोलीस अश्या प्रदूषणात आपली सेवा बजावत असतो. सेवा बजावत असताना शहर वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी त्यांच्यातील संवेदनशीलता दाखवून बरीच सामाजिक कामे सुद्धा केली आहेत. मग ती भुकेल्या व्यक्तीला अन्न पाणी देणे असो की गरजू लोकांना मास्क वाटणे असो की जेष्ठ व वृद्ध नागरिकांना वर्दळीचा रस्ता ओलांडण्यास मदत करणे असो किंवा चौकात किंवा रस्त्यावर हरविलेले एखादे पाकीट, पर्स, मोबाईल किंवा महत्वाची कागदपत्रे असो, शहर वाहतूक पोलीस अगदी पुढे असतो. म्हणूनच की काय एखाद्या नागरिकांचे काही महत्वाची वस्तू रस्त्यावर हरविली की ते हमखास चौकातील वाहतूक पोलिसांकडे चौकशी करतांना दिसत आहेत.
असाच प्रसंग आज ९ मार्च रोजी अशोक वाटिका चौकात घडला. शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार भास्कर दामोदर व गुलाम मुस्तफा रशीद खान हे आपले कर्तव्य पार पाडीत असताना त्यांना चौकात सॅमसंग कंपनीचा एक महागडा मोबाईल पडलेला दिसला त्यांनी पाहिले असता तो लॉक केलेला दिसला ते आजूबाजूला चौकशी करीत असतानाच त्या मोबाईल वर फोन आला व फोन कर्त्याने त्याचे नाव अमित बन्सल (राहणार आर डी जी महाविद्यालय जवळ) असून तो त्यांचा मोबाईल असल्याचे सांगितले. वाहतूक पोलिसांनी त्यांना अशोक वाटिका चौकात मोबाईलचे बिलासह बोलावून खात्री करून त्यांचा मोबाईल त्यांना परत केला.
अमित बन्सल यांनी वाहतूक पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले. वाहतूक पोलीस दामोदर आणि मुस्तफा यांच्या प्रामाणिकते बद्दल शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके व सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा