Akola: lockdown नियमावलीत बदल: दुकाने व आस्थापना सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत निर्बंधासह सुरु; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश





दुकानदार व कामगार यांना कोविड चाचण्या अनिवार्य


भारतीय अलंकार24

अकोला: कोरोनाचा वाढता संसर्गामुळे प्रतिबंधात्मक क्षेत्र असलेल्या अकोला, मुर्तीजापुर, आणि अकोट शहरात 23 फेब्रुवारी पासून 28 फेब्रुवारी पर्यंत लॉक डाउन पुकारण्यात आला होता, यानंतर सतत रुग्णांची वाढ होत असल्याने हा लॉक डाउन 8 मार्च पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र छोटे व्यापाऱ्यांचा, मजुरांचा आणि इतर उद्योगांचा होत असलेले नुकसान पाहता विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्ससह 50 व्यापारी संघटनेने सर्व प्रतिष्ठान उघडण्यात यावी अशी मागणी केली होती. काल या संदर्भात झालेल्या बैठकीत लॉक डाऊन नियमावलीत  पुन्हा सुधारणा करण्यात आली आहे. आता या निर्णया प्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातील प्रतिष्ठान सकाळी नऊ ते पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. याआधी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यवसायाला परवानगी देण्यात आली होती. प्रशासनाने निर्धारित कालावधीत अटी व शर्तीवर प्रतिबंधात्मक क्षेत्रातील प्रतिष्ठान सुरू करण्याची परवानगी व्यापाऱ्यांना दिली आहे. या अनुषंगाने आता नवीन नियमानुसार..


१) जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील


२) व्यापारी आणि त्यांच्याकडे कामावर असलेल्या व्यक्तींची कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे.


३) सर्व प्रकारच्या उपाहारगृह, हॉटेल्स यांना सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत फक्त पार्सल सुविधा देण्याची परवानगी आहे.


४) लग्नसमारंभासाठी केवळ पंचवीस व्यक्तींना परवानगी राहणार आहे.


५) दूध विक्रीसाठी वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत राहणार आहे.


६) सर्व पेट्रोल पंप सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे.


७) ज्या उद्योगांना या आधी परवानगी देण्यात आली आहे ते सर्व उद्योग सुरु राहील.


८) सर्व शाळा ,महाविद्यालय, शिकवणी वर्ग पुढील आदेश पर्यंत बंद राहील.


९) सिनेमा हॉल, नाट्यगृहे, तरणतलाव हे सुद्धा बंद राहील.


१०) दारू विक्रीच्या दुकान आणि बारला फक्त पार्सल विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.


सर्वात महत्वाचे म्हणजे येणाऱ्या 6 आणि 7 मार्च वगळता प्रत्येक शुक्रवारच्या रात्री 8 वाजतापासून सोमवार सकाळी 6 वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदी राहणार आहे.


असा आहे आदेश

कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सामाजिक अंतर व आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करुन जिल्ह्यातील प्रतिबंधीत व प्रतिबंधीत क्षेत्र वगळून निर्बंधासह सोमवार (दि. 8) पर्यंत आदेश  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी  निर्गमित केले.


सर्व प्रकारच्‍या सेवा अंतर्गत असेलली प्रतिष्‍ठाने, दुकाने पुढील आदेशापर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरु राहतील,  मात्र सर्व सबंधीत व्‍यवसायीक, दुकानदार तसेच  कामगार यांनी त्‍यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य राहील. ज्‍या प्रतिष्‍ठान, दुकान, व्‍यवसाय येथील सर्व संबंधीतांची  कोविडची चाचणी निगेटीव्‍ह  आली असेल, अशाच  प्रतिष्‍ठान, दुकान, व्‍यवसायीक यांना त्‍यांची आस्‍थापने  सुरु ठेवता येईल.  अन्‍यथा अशी प्रतिष्ठाने सिल करण्‍यात येईल तसेच त्‍यांचेवर दंडात्मक  कारवाई सुद्धा करण्‍यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहे.




खाद्यगृहे, रेस्‍टॉरेन्‍ट  यांचे  किचन व स्‍वयंपाकगृह  हे  सकाळी  नऊ ते नऊ या वेळेत सुरु राहतील, अशा खाद्यगृह व  रेस्‍टॉरेंट यांना  फक्‍त घरपोच सेवा देण्याकरिता परवानगी अनुज्ञेय राहील, दुध विक्री, दुधाचे घरपोच वितरण सकाळी सहा ते सायंकाळी  सात या कालावधीत  अनुज्ञेय राहील, सर्व खाजगी व वैद्यकिय सेवा, सर्व खाजगी व शासकीय रुग्‍णालये, पशुचिकित्‍सक सेवा व रुग्‍णालये  त्‍यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील, सर्व रुग्‍णालय व रुग्‍णालयाशी निगडीत सेवा त्‍यांचे नियमित वेळेनुसार सुरु राहतील व कोणतेही रुग्‍णालय बंदचा आधार घेवून रुग्‍णांना आवश्‍यक सेवा नाकारणार नाही. औषधीची दुकाने व मेडीकल हे नियमीत वेळे प्रमाणे सुरु राहतील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.




सर्व पेट्रोल पंप सायंकाळी पाचवाजेपर्यंत  सुरु राहतील. तर मे. वजीफदार अँड सन्‍स, वसंत देसाई स्‍टेडीयम जवळ अकोला,  मे. एम.आर. वजीफदार अँड कं. आळशी प्‍लॉट अकोला,  मे. केबीको ऑटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला, औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रामधील, मे. न्‍यु  अलंकार सर्वो, वाशिम बायपास अकोला  हे रात्री  नऊ वाजेपर्यंत अत्‍यावश्‍यक सेवेकरिता सुरु राहतील. तसेच पेट्रोलपंपाना अत्‍यावश्‍यक सेवा वगळता अन्‍य कारणाकरीता विक्री प्रतिबंधीत राहील. 


महानगरपालीका, नगर परिषद, नगरपालीका क्षेत्रातील ज्या उद्योगांना सुरु ठेवण्याकरीता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु ठेवण्याकरीता परवानगी राहील, सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये आणि बॅंका (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आरोग्य व वैद्यकीय, कोषागार, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, NIC, अन्न व नागरी पुरवठा, FCI, N.Y.K., महानगरपालीका सेवा वगळून) ह्या 15 टक्के किंवा 15 व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहतील, लग्नसमारंभाकरीता 25 व्यक्तींना (वधू व वरासह) तहसिलदारांकडुन परवानगी अनुज्ञेय राहील.




सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये विद्यापीठ, महाविद्यालये व शाळा येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रीका तपासणे, निकाल घोषित करणे इ. कामाकरीता परवानगी अनुज्ञेय राहील, मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूक साठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही, सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक अतिआवश्‍यक कामासाठी संबंधित क्षेत्रातील पोलीस निरीक्षक यांची पुर्व परवानगी घेऊन अनुज्ञेय राहील, ठोक भाजीमंडई सकाळी तीन ते सहा या कालावधीत सुरु राहील. परंतु  मंडईमध्‍ये किरकोळ विक्रेते यांनाच प्रवेश राहील. संबंधीत व्‍यवसायकांनी कोविडची चाचणी करणे अनिवार्य राहील.




संपूर्ण जिल्‍हातील सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील, तसेच सर्व प्रकारची मद्यविक्रीची दुकाने, बार रेस्‍टॉरेंट हे सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत केवळ पार्सल सुविधेकरिता सुरु राहिल, संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये सर्व प्रकारची सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन उद्याने, नाटयगृहे, प्रेक्षकगृहे, व इतर संबंधित ठिकाणे ही बंद राहतील, तसेच शहरी व ग्रामीण भागातील भरविण्‍यात येणारे आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहतील, संपूर्ण जिल्ह्यातील प्रतिबंधात्‍मक क्षेत्रासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये संचारबंदीच्या कालावधीत सर्व प्रकारची सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील, तसेच  सर्व धार्मिक स्‍थळे प्रतिबंधित क्षेत्रामध्‍ये नागरिकांसाठी पुर्णपणे बंद राहतील, महानगरपालिका, नगर परिषद व नगर पालिकाक्षेत्रातील सर्वप्रकारची बांधकामे सार्वजनिक, खाजगी, शासकीय ज्‍यांना परवानगी  प्रदान करण्‍यात आलेली आहे ती  सर्व  सुरु राहतील, ऑनलाईन शिक्षण व त्‍या संबंधीत उपक्रमांना परवानगी राहील.




लग्‍न संमारंभाकरिता 25 व्‍यक्‍तींनाच परवानगी


महानगर पालिका क्षेत्राकरिता उपविभागीय अधिकारी, ग्रामीण भागाकरिता तहसिलदार, तर नगर परिषद क्षेत्राकरिता मुख्‍याधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे, तसेच लग्‍न समारंभाचे ठिकाणी सीसीटीव्‍ही यंत्रणा कार्यान्‍वीत करणे बंधनकारक राहील, लग्‍न समारंभा किंवा इतर समारंभाकरिता 25 व्‍यक्‍तींपेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती आढळून आल्‍यास संबंधीत चालक, मालक व व्‍यवस्‍थापक यांना 10 हजार रुपयांचा दंड तसेच 50 पेक्षा जास्‍त व्‍यक्‍ती आढळून आल्‍यास प्रती व्‍यक्‍ती दोनशे रुपये यापैकी जी जास्‍त असेल त्‍या प्रमाणे दंड आकारण्‍यात येईल. दुसऱ्यांदा आढळल्‍यास मंगल कार्यालय, सभागृह, लॉन 15 दिवसांकरिता सिल करण्‍यात येईल. लग्‍नप्रसंगी अथवा कोणत्‍याही कार्यक्रमाच्‍या वेळी गर्दी होणारी  मिरवणूक काढता येणार नाही, असे  आढळल्‍यास नियमानूसार गुन्‍हा दाखल करण्‍यात येईल, आयोजकाने लग्‍नाचे स्‍थळ तसेच किती लोक उपस्थित राहणार आहेत याची माहिती संबंधीत पोलीस स्‍टेशन यांना कळविणे बंधनकारक राहील.




शनिवार दि. 6 व रविवार दि. 7 मार्च वगळता येणाऱ्या प्रत्‍येक शुक्रवारीचे रात्री आठ ते सोमवारचे सकाळी सहावाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यामध्‍ये  संचारबंदी लागू करण्‍यात येत आहे.




संचारबंदीच्‍या कालावधीत मुभा


शासकीय तसेच खाजगी अम्‍बुलन्‍स सेवा, रात्रीच्‍या वेळेस सुरु राहणारी औषधीची दुकाने, दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्‍वेने तसेच एसटी बस व प्रायव्‍हेट लक्‍झरीने उतरणाऱ्या प्रवाश्‍याकरिता अटोरिक्‍शा, हायवेवरील पेट्रोल पंप व ढाबे, एम.आय.डी.सी. क्षेत्रातील उद्योगातील कर्मचारी व कामगार यांना संचाबंदीच्‍या कालावधीत त्‍यांच्‍या कार्यालयातील ओळखपत्राचे आधारे जाण्‍या-येण्‍याकरिता परवानगी राहील. तसेच मे. वजीफदार अन्‍ड सन्‍स, वसंत देसाई स्‍टेडीयम जवळ अकोला, मे. एम.आर. वजीफदार अन्‍ड कं. आळशी प्‍लॉट अकोला, मे. केबीको अटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला,  औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रामधील, मे. न्‍यु  अलंकार सर्वो, वाशिम बायपास अकोला  अत्‍यावश्‍यक सेवेकरिता सुरु राहतील. या पेट्रोलपंपाना अत्‍यावश्‍यक सेवा वगळता अन्‍य कारणाकरीता विक्री प्रतिबंधीत राहील.




संचारबंदीचे कालावधीमध्‍ये भाजीमंडी, भाजीपाला, फळांची विक्री करणारे बाजार तसेच  किरकोळ भाजीपाला व फळांची  विक्रीची दुकाने  बंद राहतील, चारचाकी वाहनामध्‍ये एक ड्रायव्‍हर व तीन व्‍यक्‍ती व  ऑटोरिक्‍शा वाहनामध्‍ये एक ड्रायव्‍हर व दोन सवारी यांनाच परवानगी राहील, प्रमाणापेक्षा जास्‍त आढळल्‍यास नियमानुसार दंड आकारण्‍यात येईल, जिल्ह्यामधील सर्व शाळा व महाविद्यालये, सर्व प्रकारची खाजगी शैक्षणीक प्रशिक्षण केन्‍द्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्‍लासेस पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्‍यात येत आहेत. या कालावधीत ऑनलाईन व दुरस्‍थ शिक्षण यांना परवानगी राहील व त्‍याला अधिक वाव देण्‍यात यावा. कोविड-19 चा प्रादुर्भाव फैलाव होवू नये या करिता वेळोवेळी निर्गमित करण्‍यात आलेले आदेशांचे उललंघन होणार नाही तसेच संचारबंदीच्या कालावधीत आदेशाचे पालन न करण्याऱ्या व्यक्ती व नागरिंकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आदेशाव्दारे कळविले आहे.

टिप्पण्या