- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: माळीपुरा परिसरातील लकडगंज टिम्बर मार्केट येथे आज पहाटे चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आग विझविण्यात यश आले असून, यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. दरम्यान, आमदार गोवर्धन शर्मा यांनी घटनास्थळी भेट देवून नागरिकांना दिलासा दिला.
चार दुकाने व तीन घराचे नुकसान
या घटनेत चार दुकाने व तीन घरे आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली. मात्र, अग्निशमन दलाच्या दिरंगाईमुळे आग विझवण्यास उशीर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला. लक्कडगंज येथे लाकडाचे आणि बांबूचे साहित्य विक्री केले जातात.
अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी
या आगीत विदर्भ टिंबर, दुर्गेश टिंबर मर्चंट, डेहणकर टिंबर मार्ट, नूर अहेमद टिंबर मर्चंट ही चार दुकाने व तीन घरांचा मोठे नुकसान झाले आहे. या दुकानातील साहित्य आणि बाकी चार घरातील साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे २५ लाखांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र,आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमनच्या २० गाड्या लागल्या आहे. या घटनेत अग्निशमन विभागाचे तीन कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला यश मिळाले आहे. घटनास्थळी एडिशनल एसपी मोनिका राऊत, एसडीपीओ सचिन कदम, नगरसेवक साजिद पठाण इरफान खान यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.
संबंधित छायाचित्रे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा