- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला: यावलखेड शेतशिवारात एका २५ वर्षीय अनोळखी युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या युवतीची आता ओळख पटली असून, मिळालेल्या माहितीनुसार समीक्षा श्रीकृष्ण देवर (२५ ) असे युवतीचे नाव असून, ती मालोकार निम्बी येथील रहिवासी आहे . तर सध्या ती अकोल्यात वास्तव्यास असल्याचे कळते.
या युवतीची जाळुन हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बोरगाव मंजू पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केलेला आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड येथे वाधोळकर यांचे शेत आहे.आज सकाळी आपल्या शेतात कुटार आणण्यासाठी गेले असताना त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. त्यांनी याबाबतची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना दिली. तेव्हा मुर्तीजापुर पोलिस उपविभागीय अधिकारी, ठाणेदार , गुन्हे अन्वेषण विभाग पोलिस निरीक्षक, ठसे तज्ज्ञासह बोरगाव मंजू पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. अर्धवट जळालेल्या मृतदेहासह घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा