- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार 24
अकोला : तुकाराम चौक कडून जुने आरटीओ ऑफिसकडे जाणा-या रिंगरोडवरील एका अपार्टमेंट मधे एका महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज बुधवार १० मार्च रोजी सांयकाळी ७ वाजताच्या सुमारास ही माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
जुने आरटीओ ऑफिसकडे जाणा-या रिंगरोड वरील एका मंगल कार्यालय जवळ असलेल्या स्वप्नशिल्प अपार्टमेट मधे राहणाऱ्या बावस्कर कुटुंबातील महिला मृत अवस्थेत आढळून आली आहे. या घातपाताच्या मागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. परिसराची पाहणी करून काही सुगावा हाती लागतो का,या दृष्टीने पोलीस चौकशी करीत आहेत. दरम्यान, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला. पुढील तपास पोलीस करीत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा