- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
File photo
भारतीय अलंकार
अकोला: भारतीय हवामान विज्ञान संस्थेच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी दिलेल्या संदेशानुसार अकोला जिल्ह्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या कालावधीत मेघ गर्जना व विजांचा कडकडाटही होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तरी याबाबत गावपातळीवरील नागरिकांना आवश्यक खबरदारी व दक्षता घेण्याबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सर्व गावपातळीवरील कर्मचाऱ्यांनी मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक, आरोग्य कर्मचारी या साऱ्यांनी आपापल्या मुख्यालयी थांबावे व दक्षता घ्यावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
दरम्यान, अकोल्यात कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता नागरिकांनी अधिक सतर्क होण्याची आवश्यकता आहे. यामुळे नागरिकांनी घरातून बाहेर पडताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा