Union Budget2021: मान्यवरांच्या प्रतिक्रिया: आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट बजेट-संजय धोत्रे

आजचा अर्थसंकल्प म्हणजे देश विक्रीची "लूट लो इंडिया स्कीम"- राजेंद्र पातोडे




भारतीय अलंकार24

अकोला: आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दृष्टीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी उत्कृष्ट बजेट सादर करून शिक्षण क्षेत्रामध्ये दलित-ओबीसी आदिवासी व सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी सवलत उपलब्ध करून जागतिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी संसाधनं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले आहे तसेच ज्येष्ठ नागरिक मातृशक्ती शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांवर भार न टाकता आरोग्यसेवा साठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हे भारताला महाशक्तिशाली राष्ट्रनिर्माण हाच या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ठरेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांनी व्यक्त केली.




संपूर्ण देशातील सार्वजनिक उपक्रम विकून 'आत्मनिर्भर भारत' ची कोरडी घोषणा देणाऱ्या सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे देश विक्रीची "लूट लो इंडिया स्कीम" असून सर्वसामान्य नागरिक आणि युवा वर्गाचा विश्वासघात करणारा अर्थसंकल्प असल्याची टिका वंचित बहूजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता तथा प्रदेश युवा महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केली आहे.


अर्थसंकल्पातून पायाभूत विकास आणि शेतकरी, कामगार, युवक युवती, नोकरदार व मध्यमवर्ग तसेच कोरोना मुळे उद्ध्वस्त झालेला लहान मोठा व्यापारी यांचे तोंडाला पाने पुसण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केले आहे.  केवळ मोठ्या कंपनी आणि सरकारचे पाठीराखे उधोगपती यांचे हित लक्षात घेवून सरकारने तरतुदी केल्या आहेत. 'ना खाऊंगा, ना खाने दुंगा' अशी फसवी वाक्य वापरून नफ्यातील पेट्रोलियम कंपन्या, विमानतळ, लालकिल्ला, रेल्वे स्टेशन विकुन मोकळे झाले आहेत. महामार्ग, वीज वितरण वाहिन्या, मालवाहतूक, शासकीय गोदामे, गेल, इंडियन ऑयलची पाइप लाइन, स्टेडियम सरकार विकणार आहे. तसेच देशातील सात बंदरेही खासगी कंपन्यांना विनासायास विकण्याची सोय या अर्थसंकल्प मध्ये आहे.



एलआयसी सारखी कंपनी विक्रीवर शिक्कामोर्तब केले असून, संरक्षण क्षेत्रात देखील खाजगी आणि नफेखोरी करणारे भांडवलदार घुसविले जाण्याची मुभा दिली आहे. आरोग्य, शिक्षण  यासारखे क्षेत्रे देखील विक्रीसाठी खुली केली आहे. एकंदरीत सरकारने जाणीवपूर्वक देश विक्रीचे टेंडर काढले असून आजचा अर्थसंकल्प इंग्रज सरकारच्या भारत लुटीची आठवण करून देणार असल्याचा घणाघात वंचितने केला आहे.



टेक्स्टाईल पार्क आरोग्यसेवा रेल्वेसेवा तसेच रस्ते त्या माध्यमातून सर्वसामान्यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच जम्मू काश्मीर ते पश्चिम बंगालच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योजना तयार करून सरकार सबका साथ सबका विकास सबका विश्वास संपादन करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कार्यरत असल्याचा प्रत्यय केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या बजेट च्या माध्यमातून दिल्याची प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.


स्वच्छता उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, रोजगाराच्या संधी प्राप्त करून देण्यासाठी टेक्स्टाईल पार्क निर्माण करण्याच्या निर्णय घेऊन तसेच शेतकऱ्यांच्या शेतमाल एम एस सी वर खरेदी करण्याची करण्याचा हमी देण्याची घोषणा करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पन्नाच्या दुप्पट भाव मिळवून देण्याची दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तसेच आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याच्या दिशेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय बचत विकासाचे दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरेल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांनी व्यक्त केले. 


बजेटचे स्वागत आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात महापौर अर्चना मसने, सुधीर रांदड, कृष्णा शर्मा,ऍड. सुभाष ठाकूर, डॉ. अभय जैन आदींनी केले आहे.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा