standing committee: अकोला मनपा स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची निवड; काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

                                     file photo The selection process of eight members for the standing committee of the corporation is in the midst of controversy;  Question marks over the role of Congress



भारतीय अलंकार24

अकोला : महानगर पालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समिती मधून आठ सदस्य निवृत्त झाल्यामुळे गुरुवारी नवीन आठ सदस्यांची निवड करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. परंतू, या निवड प्रक्रियेवर काँग्रेस पक्षाने आक्षेप नोंदविल्याने या निवड प्रक्रियेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. 


दरम्यान, अकोला महानगर पालिकेत स्थायी समितीमध्ये सत्ताधारी भाजपचे दहा सदस्य आहेत. तसेच शिवसेनेचे दोन, काँग्रेसचे दोन आणि दोन सदस्य लोकशाही आघाडीचे असे एकूण १६ सदस्य आहेत. 



महिलांना संधी

यापैकी आठ सदस्य निवृत्त झाले असून यामध्ये भाजपचे पाच, सेना, काँग्रेस व लोकशाही आघाडीच्या प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे. गुरुवारी ऑनलाइन पद्धतीने सदस्य निवडीची सभा पार पडली. यामध्ये भाजपच्या आरती घोगलिया, माधुरी मेश्राम, आम्रपाली उपरवट, मंगला सोनोने व अनुराधा नावकार यांची निवड करण्यात आली.  शिवसेनेने प्रमिला गीते आणि लोकशाही आघाडीने शितल गायकवाड तसेच काँग्रेसकडून मोहम्मद इरफान, पराग कांबळे यांना संधी देण्यात आली.



दुसऱ्यांदा संधी का?


स्थायी समितीमध्ये निवड केलेल्या मोहम्मद इरफान व पराग कांबळे यांना यापूर्वी देखील संधी देण्यात आली होती. या दोघांचीही दुसऱ्यांदा निवड करण्यात आल्याने काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सभागृहात पक्षाची भक्कम बाजू मांडणारे डॉ.जिशान हुसेन यांना संधी का देण्यात आली नाही, यावर पक्षातीलच इतर नगरसेवकांनी आवाज उठविला. यावर विचार मंथनही सुरू झाले आहे. आता या प्रक्रियेसाठी काँग्रेसकडून कोणते पाऊल उचलले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टिप्पण्या