Road accident: पिंजर ते महान रोडवरील हातोला नजिक दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार तर बाप लेक गंभीर जखमी




भारतीय अलंकार

अकोला: पिंजर ते महान रोडवरील हातोला नजिक आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास झालेल्या दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी झाले आहेत. मृतकाचे नाव गोपाल होले असून, (वय अंदाजे २९ वर्ष रा.सारकीन्ही ता. बार्शिटाकळी जिल्हा अकोला) जखमीचे नाव सुनील म्हैसने (वय अं.४० वर्ष) व दर्शन सुनिल म्हैसने (वय अं. १०वर्ष रा.महान ता.बार्शी ता.बार्शीटाकळी जिल्हा अकोला) असे आहे.




घटनाक्रम 

पिंजर ते महान रोडवर अपघात झाल्याची माहिती पिंजर येथील व्यापारी शैलेश जयस्वाल यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. लगेचच दीपक सदाफळे यांनी त्यांचे सहकारी मयुर सळेदार, महेश साबळे आणि पथकाची रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहचले.    तोपर्यंत दीपक सदाफळे हे हातोला येथील  संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे स्वयंसेवक योगाआप्पा मानेकर यांच्या संपर्कात होते. 


जखमी हे गंभीर स्वरूपात बेशुद्ध अवस्थेत रोडवर पडलेले होते. तीनही जखमी हे कुठल्याही प्रकारे प्रतिसाद देत नसल्याची माहिती योगा आप्पा मानेकर यांनी जिवरक्षक दीपक सदाफळे यांना दिली. यावेळी क्षणाचाही विलंब न करता दीपक सदाफळे यांनी योगा आप्पा यास तुम्ही तेथुन असेल त्या वाहनाने जखमींना महान येथे घेऊन जा लगेच हातोला येथील स्वयंसेवकानी  तात्काळ महान प्रा.आ. केंद्रात दाखल केले. यावेळी तेथील डाॅक्टरांनी उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा रुग्णालयात पाठविले यावेळी महान येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे स्वयंसेवक शुभम जवके,महेश शेवलकार, ओम दाते, प्रभुदास जवके, निखील पोफळे, गजानन बोबडे यांनी अकोला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. यावेळी या अपघातातील  जखमीपैकी सारकीन्ही येथील गोपाल होले नामक व्यक्तीचा अकोला जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत झाल्याची तसेच महान येथील बापलेक सुनिल म्हैसने,वय अं.(35) वर्ष दर्शन सुनिल म्हैसने वय अं.(10) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डाॅक्टरांनी सांगितले. अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.

टिप्पण्या