- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
भारतीय अलंकार24
अकोला: कोविड-19 चा प्रादुर्भाव व फैलाव होवू नये, याकरीता सामाजिक अंतर व आवश्यक उपाययोजनेचा अवलंब करुन प्रतिबंधात्मक क्षेत्राकरिता निर्गमित केलेल्या आदेशामध्ये अंशत बदल करुन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश निर्गमित केले.
सुधारित आदेश निर्गमित :
केमीस्ट व औषधीची दुकाने नियमित वेळेनुसार सुरु राहतील.
प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व पेट्रोल पंप सकाळी आठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरु राहतील.
तसेच सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत मे. वजीफदार अन्ड सन्स, वसंत देसाई स्टेडीयम जवळ अकोला, मे. एम.आर. वजीफदार अन्ड कं. आळशी प्लॉट अकोला, मे. केबीको अटो सेंटर, शिवाजी महाविद्यालयासमोर अकोला, औद्योगीक विकास महामंडळ क्षेत्रामधील, मे. न्यु अलंकार सर्वो, वाशिम बायपास अकोला सुरु राहतील.
तसेच प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत केलेल्या तालुक्यामध्ये पेट्रोलपंप सुरु ठेवण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित करेल, असे जिल्हाधिकारी यांनी आदेशाव्दारे कळविले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा