Lockdown day2: नियमांची पायमल्ली करणाऱ्या बड्या प्रतिष्ठानवर कारवाई



भारतीय अलंकार24

अकोला : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २३ फेब्रुवारी पासून अकोला शहरात लॉकडाउन सुरू आहे. आज लॉक डाउनचा दुसरा दिवस आहे. आजचा दिवसही सामान्य अकोलेकरांनी शिस्तबद्ध पाळला. मुख्य बाजारपेठही बंद होती. मात्र, काही प्रतिष्ठान मध्ये छुप्या पद्धतीने कामकाज सुरू होते. अश्या प्रतिष्ठानवर संयुक्त पथकाने कारवाई केली. या अंतर्गत आज नेहरू पार्क जवळील टिव्हिएस शोरूम वर या पथकाने कारवाई केली.



२८ फेब्रुवारी पर्यंत बंदचे आदेश

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन द्वारा नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसोबत कृषी केंद्र आणि कृषी निविष्ठाच्या दुकानांना दुपारी ३ वाजेपर्यंतच मुभा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारच्या प्रतिष्ठानाला २८ फेब्रुवारी पर्यंत बंदचे आदेश आहे, असे असतांना देखील अनेक प्रतिष्ठान नियमांची पायमल्ली करत आपला व्यवसाय छुप्यारित्या सुरू ठेवून कामकाज करीत असल्याचे पथकाच्या निदर्शनात आले. नियमांची अमल बजावणी व्हावी, याकरिता प्रशासनाने  पथक तयार केली आहे. यामध्ये विना मास्क फिरणारे, सोशल डिस्टनसिंगचे पालन न करणाऱ्या लोकांवर या पथकद्वारे कारवाई सुरू आहे.



एक हजार रुपयेचा दंड 

दरम्यान, आज नेहरू पार्क जवळील टिव्हीएस शोरूमवर या पथकाने कारवाई केली आहे. कोणतीही परवानगी नसतांना या शोरूममध्ये दुचाकी गाड्यांची काम सुरू होती. नियमांचा भंग केल्या प्रकरणी या प्रतिष्ठाणवर पथकाने कारवाई करून एक हजार रुपयेचा दंड ठोठावला आहे.

टिप्पण्या