- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
माजीमंत्री डाँ. दशरथ भांडेनी केला शासनाचा जाहीर निषेध
भारतीय अलंकार
अकोला: शासनाने पशुधन मंडळाचे कार्यालय अकोला येथून नागपुरला पळविणारा आदेश काढून मंडळाच्या मुळ उद्देशालाच फासली याचा मी जाहीर निषेध करतो व अकोला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधिंना आवाहन करतो की, पक्षभेद बाजूला सारून हे मंडळ पुन्हा अकोल्यात आणण्यासाठी एका व्यासपीठावरून आंदोलन उभे करावे व आपआपल्या परिने शासनास पशुधन मंडळ पुन्हा अकोल्यात आणण्यास भाग पाडावे, असे आवाहन माजी मंत्री डाँ. दशरथ भांडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
पशुधन मंडळाविषयी माहिती देतांना डॉ. भांडे म्हणाले की, मी सदर खात्याचा मंत्री असतांना महाराष्ट्रात पशुधन मंडळाची स्थापना झाली. तेव्हा ते पुणे येथे सुरू झाले होते. परंतु मी त्या खात्याचा मंत्री असल्याने तात्कालीन मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्या व मागास भागातील विकासाच्या दुष्टिकोनातून या मंडळाची स्थापना झाली आहे. त्यामुळे त्याचा मुळ उद्देश सफल करण्यासाठी हे मंडळ अकोला येथे असणे आवश्यक आहे त्यावर तत्कालीन मंत्रीमंडळाने ताबडतोब निर्णय घेवून पुणे येथे सुरू झालेले पशुधन मंडळ अकोला येथे देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले होते. त्यावेळेस मी स्वत: केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटून ५० करोड रुपये निधी त्यांच्याकडून पशुधन मंडळाला आणला होता. त्यामाध्यमातून काम सुरू झाले होते. मात्र आपल्याकडच्या लोकप्रतिनिधींची अनास्था आहे की, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील पशुधन मंडळ दुसरीकडे गेले. आता यासाठी लोकलढा उभा करून गेलेले मंडळ पुन्हा आपल्या जिल्ह्यात यावे यासाठी आम्ही आपल्या सर्वांच्या सहकार्याने आंदोलन उभे करणार आहोत. तरी माझी जिल्ह्यातील जनतेला विनंती आहे की,आपआपल्या लोकप्रतिनिधींना पशुधन मंडळ आपल्या जिल्ह्यामध्ये पुन्हा आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यास भाग पाडावे,असे आवाहन डॉ. भांडे यांनी केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध केला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा