Hatrun Fire : हातरुण गावात निवडणुकीनंतर जाळपोळ घटनेत वाढ: गावकऱ्यांचा आरोप




अकोला: जिल्ह्यातील हातरूण गावात निवडणुकीनंतर जाळपोळच्या घटनेत वाढ झाल्याच आरोप आता गावकरी करत आहे. ताज्या घटनेत पहाटे हातरुण येथील मोहम्मद हनीफ यांच्या शेतात ठेवलेल्या हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीकडून  आग लावण्यात आली आहे. 


यामध्ये शेतातून काढलेला तीन एकर वरील हरभरा जळून खाक झाला आहे. यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे एक लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. 



ग्रामपंचायत निवडणुकी नंतर आतापर्यंत या गावात  जाळपोळीच्या नऊ घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीच्या बोअरवेलसह तीन बोअरवेलचे तुकडे करून खड्ड्यात  टाकण्यात आली आहेत. गावातील चौकातील पान टपरी सुद्धा काही दिवसांपूर्वी अज्ञातांकडून जाळण्यात आली होती. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी त्वरित कारवाई करण्याची मागणी आता ग्रामस्थांनी केली आहे.



टिप्पण्या