- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा कहर केला आहे. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन परीक्षा घेण्यावरच शिक्षण विभाग भर देणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता ही परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठरलेल्या वेळापत्रकनुसार परीक्षा
दहावी आणि बारावी या महत्त्वाच्या वर्षाच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यास बोर्ड अनुकूल नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा आज शिक्षण विभागाने घेतला आहे. या परीक्षा सध्या तरी ठरलेल्या वेळापत्रक नुसार घेण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
ग्रामीण विद्यार्थ्यांचा प्रश्न
ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टीव्हीटी नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नाहीत. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह आहे. राज्यात दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी आहेत. त्यामुळे कोरोना काळात इतकी मोठी संख्या असणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा नेमकी कशी होणार, हा प्रश्न आहेच.
परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर
महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा याआधीच जाहीर केल्या आहेत. दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा २३ एप्रिल ते २० मे दरम्यान होणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक देण्यात आले आहे.
एप्रिल-मे मध्ये परीक्षा
यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा २३ एप्रिलपासून सुरू होईल तर २१ मे रोजी बारावीचा शेवटचा पेपर असेल, तर दहावीची परीक्षा २९ एप्रिल ते २९ मे या कालावधीमध्ये घेतली जाईल. दहावीच्या परिक्षेचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि बारावीच्या परिक्षांचा निकाल जुलै महिन्याच्या अखेरीस लागणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा