Corona:Akola:अतिसवेदनशील भागात विशेष मोहिम राबवून आरटीपीसीआर व रॅपिड टेस्टचे प्रमाण वाढवावे-पियुष सिंह यांचे निर्देश




भारतीय अलंकार24

अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थिती व उपाययोजना बाबत आज विभागीय आयुक्त यांनी आढावा घेतला. कोविड रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. या पार्श्वभुमिवर जिल्ह्यात सर्व यंत्रणांनी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन कोविड रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेवून चाचण्याचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी  दिलेत.





जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आयोजित बैठकीस ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस आयुक्त जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शासकीय  वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय जाधव, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाडवे, वैद्यकीय महाविद्यालय अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन अंभोरे आदी उपस्थित होते.




यावेळी विभागीय आयुक्त यांनी मनपा व ग्रामीण भागातील रुग्ण संख्या वाढ, मृत्यू संख्या वाढ, होम आयसोलेशन सद्यास्थिती, औषधी व बेड स्थितीबाबत आढावा घेतला. होम आयसोलेशमध्ये असलेल्या रुग्णांच्या निवासस्थानाच्या दर्शनी भागात पॉझिटिव्ह रुग्ण असल्याबातचे फलक लावावे,  आसोलेशन मध्ये असलेल्या रुग्णाकडे स्वतंत्र्य व्यवस्था आहे याची खातरजमा करुन असे रुग्ण नियमाचे पालन करत नसल्याचे आढळल्यास त्याना संस्थागत विलगीकरण किवा फौजदारी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.




अतिसवेदनशील भागात विशेष मोहिम राबवून आरटीपीसीआर व रॅपिड टेस्टचे प्रमाण  वाढवावे  तसेच  ऍक्टीव्ह रुग्ण संख्या कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना काटेकोरपणे करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त यांनी संबंधिताना दिल्यात. जिल्ह्यामध्ये ऑक्सीजन सिलेंडरचा पुरेसा साठा आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचे नमूने ठेवण्यासाठी डिप फ्रिझरची खरेदी करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्यात.



टिप्पण्या