corona update: अकोला: आज १७३ पॉझिटीव्ह; २ रुग्ण मयत

             *कोरोना अलर्ट*

*आज शनिवार दि. २०  फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*



*प्राप्त अहवाल-६६२*
*पॉझिटीव्ह- १७३*
*निगेटीव्ह-४८९*



*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १७३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ७१ महिला व १०२ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील २३, जीएमसी येथील १२, कौलखेड येथील १०, डाबकी रोड येथील नऊ, विरवाडा ता.मुर्तिजापूर येथील आठ, भारती प्लॉट, गोरक्षण रोड व जठारपेठ  येथील प्रत्येकी सहा, दगडी पुल, खडकी व लखनवाडा येथील प्रत्येकी पाच, रामदासपेठ येथील चार, मलकापूर येथील तीन, व्हीबीएच कॉलनी,तुकाराम चौक, खडकी, धोगा, मोठी उमरी, जवाहर नगर, गायगाव, सूधीर कॉलनी, घुसर, मनकर्णा प्लॉट, गड्डम प्लॉट व खदान येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित व्यकटेश नगर, कोठारी नगर, अशोक नगर, कलमेश्वर, रजपुतपूरा, पोलिस हेडक्वॉटर, अकोट फैल, स्वराज्य भवन, कान्हेरी सरप, जीएमसी हॉस्टेल, तापडीया नगर, नवरंग सोसायटी, गंगाधर प्लॉट, किर्ती नगर, न्यु राधाकिसन प्लॉट, कॉग्रेस नगर, गंगा नगर, तोष्णीवाल लेआऊट, बोरगाव मंजू, रवी नगर, विद्या नगर, अपोती, खोलेश्वर, वानखडे नगर, आश्रय नगर, केडीया प्लॉट, देवरावबाबा चाळ, शिवनगर, हाजी नगर, हरिहर पेठ, रतनलाल प्लॉट, पवन वाटीका, अकोली, जूने शहर, उमरी, मोरेश्वर कॉलनी, डोंगरगाव, गीता नगर, हिवरखेड, शिवाजी नगर, कोठारी वाटीका, एसबीआय कॉलनी, दहिहांडा, गायत्री नगर, शास्त्री नगर, पिंजर व पार्वती नगर येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज दोघांचे मृत्यू झाले. त्यात कृषि नगर, खदान येथील ३० वर्षीय महिला असून ती १७ रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला, तर विजय हाऊसिंग कॉलनी येथील ७३ वर्षीय महिला असून ती ९ फेब्रुवारी रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.



दरम्यान काल रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात २७ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.



*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१११३५+२२८१+१७७=१३५९३*
*मयत-३५०*
*डिस्चार्ज-११४२१*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१८२२*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या