corona update: Akola: आज १६१ पॉझिटीव्ह

             *कोरोना अलर्ट*

*आज बुधवार दि. १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल- ५२६*  
*पॉझिटीव्ह-१६१*
*निगेटीव्ह-३६५*

*अतिरिक्त माहिती*

आज सकाळी १६१ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ६२ महिला व ९९ पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी येथील २६, मुर्तिजापूर येथील १९, अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड, डाबकी रोड, चतुभुज कॉलनी व हिंगणा रोड येथील प्रत्येकी पाच, सिधी कॅम्प, रेणूका नगर, लहान उमरी, तोष्णीवाल लेआऊट व तुकाराम चौक येथील प्रत्येकी चार, रामदासपेठ, आदर्श कॉलनी व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, मोठी उमरी, आश्रय नगर, लक्ष्मी नगर, बार्शिटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित तारफैल, पिंपरी खुर्द ता.अकोट, राधाकिसन प्लॉट, कौलखेड, संतोष नगर, मलकापूर, जीएसी क्वॉटर, बाळापूर, सातव चौक, मालीपुरा, उमरी, जयहिंद चौक, दिपक चौक, सराफा बाजार, जवाहर नगर, गिता नगर, टिटवा, रिधोरा, मोमिनपूरा, विठ्ठल नगर, दुर्गा चौक, पिंपलसिंगे, वाशिम बायपास, गोविद नगर, राऊतवाडी, विद्या नगर, स्नेहा नगर, तापडीया नगर, कापशी, चोहट्टा बाजार, गड्डम प्लॉट, खडकी, अकोट फैल, बाळापूर रोड, हिवरखेड ता.तेल्हारा, विद्युत कॉलनी, मराठा कॉलनी, आळसी प्लॉट, राम नगर, बिर्ला कॉलनी, गिरी नगर, न्यु तापडीया नगर व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. 

दरम्यान आज दुपारनंतर दोन जणांचे मृत्यू झाले. त्यात अडगाव खुर्द ता. अकोट येथील रहिवासी असलेल्या ७१  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ९ रोजी दाखल करण्यात आले होते, तर मुर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या ७०  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. ११ रोजी दाखल करण्यात आले होते.

दरम्यान काल (दि.१६) रात्री रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात ४० जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल-१०४७२+२२१६+१७७=१२८६५*
*मयत-३४६*
*डिस्चार्ज-११२८९*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-१२३०*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*मास्क वापरा- हात धुवा- शारीरिक अंतर पाळा!*

टिप्पण्या