- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अलंकार24
अकोला: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 82 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 70 अहवाल निगेटीव्ह तर 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालया कडून प्राप्त झाली आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.7) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 11854 (9602+2075+177) झाली आहे. तर सध्यपरिस्थितीत 802 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 86486 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 84675 फेरतपासणीचे 346 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1465 नमुने होते. आजपर्यंत एकूण 86339 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 76737 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
12 पॉझिटीव्ह
आज सकाळी 12 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात एक महिला व 11 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील दुर्गा चौक, गोरक्षण रोड, कव्हर नगर, न्यू तापडीया नगर, अडगाव हिवरखेड ता. तेल्हारा, डाबकी रोड, जीएमसी क्वॉटर, रणपिसे नगर, शिवणी, जवाहर नगर, जीएमसी व शिवाजी पार्क येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
दरम्यान काल रात्री (दि.7) रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
22 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून एक, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 18 अशा एकूण 22 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
802 जणांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या11854(9602+2075+177)आहे. त्यातील 338 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 10714 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 802 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन टेस्टः 95 चाचण्यात आठ पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 95 चाचण्या झाल्या त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
आज दिवसभरात बार्शीटाकळी येथे एक, तेल्हारा येथे आठ तर मुर्तिजापूर येथे 10, आरोग्य कर्मचाऱ्यांचा 17 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. तर अकोट येथे 12 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आयएमए येथे 11 जणांच्या चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 36 चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. अशा एकूण 95 चाचण्यांमधून आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 466 चाचण्या झाल्या पैकी 2136 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा