Corona update: अकोला: 712 रुग्ण घेत आहेत उपचार; 122 रुग्णांना डिस्चार्ज




भारतीय अलंकार

अकोला: आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 352 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 302 अहवाल निगेटीव्ह तर 50 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 122 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.



त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 11984(9711+2096+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 87074 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 85249 फेरतपासणीचे 351 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1474 नमुने होते. आजपर्यंत एकूण 87008 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 77297   आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 


50 पॉझिटीव्ह


आज दिवसभरात 352 जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 48 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 15 महिला व 33 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील कौलखेड व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी चार, डाबकी रोड, गिता नगर, मुर्तिजापूर व जूने शहर येथील प्रत्येकी तीन, मलकापूर, देशमुख फैल, खडकी व जीएमसी येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित राऊतवाडी, रचना कॉलनी, गजानन नगर, मोठी उमरी, शिवनगर, खोलेश्वर, अकोट, मोरद ता.बार्शीटाकळी, जवाहर नगर, तापडीया नगर, दिपक चौक, केडीया प्लॉट, अंनत नगर, केशर वेताल ता.पातूर, सिंधी कॅम्प, न्यु तापडीया नगर, सिव्हील लाईन, भागवत वाडी, लहरीया नगर व जीएमसी हॉस्टेल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी दोघांच्या अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष असून ते सीएस ऑफिस व जैन नगर डाबकी रोड येथील रहिवासी आहे.


दरम्यान काल रात्री (दि.9) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 13 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.


122 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पीटल येथून एक, ओझोन हॉस्पीटल येथून एक, बिहाडे हॉस्पीटल येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, सुर्याचंद्र हॉस्पीटल येथून सहा, तसेच होम आयसोलेशनचा कालावधी पूर्ण झालेले 104 अशा एकूण 122 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.


712 जणांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 11984(9711+2096+177) आहे. त्यातील 341 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 10931 आहे. तर सद्यस्थितीत 712 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट

कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 91 चाचण्या झाल्या त्यात 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात बाळापूर येथे एक, बार्शीटाकळी येथे एक,  आयएमए अकोला येथे तीन, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या 16 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तर अकोट येथे आठ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तेल्हारा येथे आठ जणांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 49 चाचण्या झाल्या त्यात चार जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. हेडगेवार लॅब येथे पाच जणांच्या चाचण्या होऊन दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. असे  एकूण 91 चाचण्यांमधून 12 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात 32 हजार 663  चाचण्या झाल्या पैकी 2161 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.


टिप्पण्या