Corona update: अकोला: आज दिवसभरात 174 पॉझिटिव्ह रुग्ण; 2 मयत: 49 जणांना डिस्चार्ज




भारतीय अलंकार24

अकोला: आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 562 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 388 अहवाल निगेटीव्ह तर 174 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 49 जणांना  डिस्चार्ज देण्यात आले असल्याचे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.


त्याच प्रमाणे काल (दि.16) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 40 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या  12878(10485+2216+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 90231 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 88140 फेरतपासणीचे 360 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 1731 नमुने होते. आजपर्यंत एकूण 89994 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 79509 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. 


174 पॉझिटीव्ह


आज दिवसभरात 562  जणांचे अहवाल प्राप्त झाले. आज सकाळी 161 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 62 महिला व 99 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील जीएमसी येथील 26, मुर्तिजापूर येथील 19, अकोट व जठारपेठ येथील प्रत्येकी सहा, गोरक्षण रोड, डाबकी रोड, चतुभुज कॉलनी व हिंगणा रोड येथील प्रत्येकी पाच, सिधी कॅम्प, रेणूका नगर, लहान उमरी, तोष्णीवाल लेआऊट व तुकाराम चौक येथील प्रत्येकी चार, रामदासपेठ, आदर्श कॉलनी व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, रणपिसे नगर, मोठी उमरी, आश्रय नगर, लक्ष्मी नगर, बार्शिटाकळी व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित तारफैल, पिंपरी खुर्द ता.अकोट, राधाकिसन प्लॉट, कौलखेड, संतोष नगर, मलकापूर, जीएसी क्वॉटर, बाळापूर, सातव चौक, मालीपुरा, उमरी, जयहिंद चौक, दिपक चौक, सराफा बाजार, जवाहर नगर, गिता नगर, टिटवा, रिधोरा, मोमिनपूरा, विठ्ठल नगर, दुर्गा चौक, पिंपलसिंगे, वाशिम बायपास, गोविद नगर, राऊतवाडी, विद्या नगर, स्नेहा नगर, तापडीया नगर, कापशी, चोहट्टा बाजार, गड्डम प्लॉट, खडकी, अकोट फैल, बाळापूर रोड, हिवरखेड ता.तेल्हारा, विद्युत कॉलनी, मराठा कॉलनी, आळसी प्लॉट, राम नगर, बिर्ला कॉलनी, गिरी नगर, न्यु तापडीया नगर व खडकी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी 13 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात तीन महिला व 10 पुरुषांचा समावेश आहे. मुर्तिजापूर येथील पाच, बाळापूर येथील चार, जीएमसी येथील दोन तर उर्वरित पळशी बु. बाळापूर व पातूर येथील रहिवासी आहे.


दरम्यान काल रात्री (दि.16) रॅपिड ॲन्टीजेन  टेस्टच्या अहवालात 40 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या पॉझिटीव्ह अहवाल संख्येत व ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह अहवाल संख्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.


49 जणांना डिस्चार्ज


दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 18, आयकॉन हॉस्पीटल येथून तीन, ओझोन हॉस्पीटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, बिहाडे हॉस्पीटल येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पीटल येथून एक, तर होम आयसोलेशन येथून 19 असे एकूण 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.


दोघांचा मृत्यू


दरम्यान आज दुपारनंतर दोन जणांचे मृत्यू झाले. त्यात अडगाव खुर्द ता. अकोट येथील रहिवासी असलेल्या 71  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते, तर मुर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या 70  वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.


1194 जणांवर उपचार सुरु


आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 12878(10485+2216+177) आहे. त्यातील 346 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  संख्या 11338 आहे. तर सद्यस्थितीत 1194  पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

टिप्पण्या