Corona impact: अमरावती व अचलपूर शहरात एक आठवडा संचारबंदी; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला निर्णय





भारतीय अलंकार24

अमरावती : राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज अमरावती साठी मोठी घोषणा केली आहे. अमरावतीत येत्या आठवड्यात लॉकडाऊन असणार आहे. हा लॉकडाऊन सोमवारी  २२ फेब्रुवारी संध्याकाळी आठ वाजेपासून अमरावती व अचलपूर शहरासाठी घोषित केला आहे. हा लॉकडाऊन सात दिवसांसाठी असणार आहे. 



ठाकूर यांची घोषणा


“सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोरोना मृत्यू दर हा सध्या 1.6 टक्के इतका आहे. आम्हाला नाईलाजाने फक्त जीवानाश्यक वस्तू सुरु ठेवावी लागणार आहेत. अमरावती शहरात पूर्ण कंटेन्मेंट झोन घोषित करुन लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. शहरातील बाजार हे गाईडलाईन्सनुसारच सुरु राहतील” 

                           - यशोमती ठाकूर 



अन्यथा आंदोलकांवर होणार कारवाई


नागरिकांनी स्वत:ची आणि सगळ्यांनी समाजाची काळजी घेण्याची गरज आहे. मास्क वापरणे आणि अंतर राखण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर सातत्याने हात धुवून स्वत: ला सुरक्षित करण्याची गरज आहे. यामध्ये जर कुणी आंदोलन  किंवा राजकीय काही करायचे ठरवले तर आंदोलकांवर व संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल, असे देखील ठाकूर यांनी स्पष्ट केले.




१२ प्रतिबंधित क्षेत्र


अमरावतीची परिस्थिती पाहाता अमरावती महानगरपालिकाने अमरावती शहरात १२ प्रतिबंधित क्षेत्र  घोषित केले आहेत. या प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवाशांना १४ दिवसापर्यंत घराच्या बाहेर निघता येणार नसून हे प्रतिबंधित क्षेत्र आहे, असे आदेश प्रशासनाने दिला आहे. तर, या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले. या १२ प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त रुग्ण आढळल्याने हा निर्णय अमरावती महानगरपालिका प्रशासनाने घेतला. दरम्यान,अचलपूर आणि परतवाडा या जुळ्या शहरात सर्वाधिक रुग्ण आढल्याने या परिसराला कोरोना हॉटस्पॉट ठरविण्यात आले.

टिप्पण्या