Akola :अखेर संजय कापडणीस यांची बदली; निमा अरोरा अकोला मनपा आयुक्तपदी



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: महापालिकेच्या आयुक्तपदी आयएएस निमा अरोरा यांची नियुक्ती झाली आहे. त्या जालना येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या नियुक्तीने अकोल्याच्या आयुक्तपदी कोण येणार, या चर्चेला आज पुर्णविराम मिळाला आहे.



मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या वादग्रस्त आणि निष्क्रिय कार्यकाळामुळे अकोलकर त्रस्त झाले होते. कापडणीस यांचे प्रशासकीय कारभारावर नियंत्रण नसल्याने मनपाचा कारभार कोलमडला आहे. अशातच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नगरसेवक यांच्यासह सामान्य नागरिकांमध्ये देखील कापडणीस यांच्याप्रती नाराजीचे सूर उमटले होते. तर मध्यन्तरी आयुक्तपदासाठी सुनील विंचनकर यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र, आज या चर्चेला विराम मिळाला आहे. 



निमा अरोरा या शुक्रवारी पदभार स्वीकारणार असल्याचे कळते. २०वर्षाच्या कालावधीत अकोला मनपाच्या आयुक्त पदी प्रथमच महिला आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती होत आहे, हे विशेष. पारदर्शी व्यवहार व शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या निमा अरोरा यांच्या नियुक्तीमुळे अकोला शहराचे भाग्य नक्कीच उजळणार,अशी अपेक्षा अकोलेकरांनी व्यक्त केली.




IAS Transfer


* एम एम सूर्यवंशी, सहसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, यांची महानगर आयुक्त, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण पदावर नियुक्ती



* राहुल रेखावार यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय ग्रामीण जीवननोत्ती अभियान, नवी मुंबई या रिक्त पदावर



* निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांची महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका, अकोला या रिक्त पदावर नियुक्ती




टिप्पण्या