Akola Police: रस्ता सुरक्षा:"हाथ जोडतो... वाहतुकीचे नियम पाळा" एनएनएस विद्यार्थ्यांचे पथ नाट्य; शहर वाहतूक शाखेचे आयोजन




भारतीय अलंकार

अकोला:रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना पथकातील विद्यार्थ्यांनी आज अकोला शहरातील चौकामध्ये वाहतूक नियमांचे पालन व जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर केले. या उपक्रमाचे आयोजन शहर वाहतूक पोलीस शाखेने केले होते.


जिल्हाधिकारी कार्यालय चौक, खुले नाट्य गृह चौक येथे पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्य मध्ये वेगाने वाहन चालविणे, मद्य प्राशन करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईल वर बोलणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे,  दुचाकी चालविताना हेल्मेट परिधान न केल्याने काय दुष्परिणाम होतात याबाबत विद्यार्थ्यांनी पाथनाट्या द्वारा नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला. 


पथनाट्य सादर करण्यासाठी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी पुढाकार घेतला. प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिसे, रासेयो अकोला जिल्हा समन्वयक डॉक्टर संजय तिडके, कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गणेश खेकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहन बुंदेले दिग्दर्शित रस्ता सुरक्षा पथनाट्य मध्ये हर्षल पाटील, अखिलेश अनासने, योगेश राऊत, शुभम जमोदे, माधुरी इंगळे, प्रगती ढोबळे, इशा मेसरे, अभिजित वानखेडे, वैभव चोपडे, अंजली खंडेराव, आम्रपाली दंदी, सचिन काळे, राजश्री इंगळे, वैष्णवी आसेकर यांनी सहभाग घेतला होता.



टिप्पण्या