- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
रस्ता सुरक्षेचे आरएसपीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण...
५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून आज शहर वाहतूक शाखेच्या वतीने अकोला शहरातील रस्ता सुरक्षा पथकाचे (आर एस पी) चे विद्यार्थाना केवळ मार्गदर्शन न करता शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी प्रत्यक्ष शहरातील गजबजलेल्या चौकात नेवून, वाहतूक पोलीस वाहतूक नियंत्रण कसे करतात, हे दाखविले. तसेच वाहतूक पोलीस त्यांचे सोबत देऊन विद्यार्थ्यांकडून वाहतूक नियंत्रण करवून घेतले. नवं काहीतरी जोखमीचे आणि जबाबदारीचं कार्य शिकायला मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह सोबतच समाधानही दिसून आले.
५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
आज सकाळी अकोला शहरातील न्यू इंग्लिश स्कुल व डी आर पाटील विद्यालयातील रस्ता सुरक्षा पथकातील जवळपास ५० विद्यार्थ्यांना शहर वाहतूक शाखेत बोलाविले. प्रथम त्यांना रस्ता सुरक्षा अभियानाची माहिती दिली. रस्ते अपघात कमी करण्यासाठी फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नसून वाहन चालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. ही मानसिकता बदलण्यासाठी आर एस पी च्या विद्यार्थ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. स्वतःसह आपले कुटुंबीय व मित्र यांना सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्व समजावून सांगून मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे मार्गदर्शन गजानन शेळके यांनी केले.
केवळ मार्गदर्शन करून न थांबता आर एस पी च्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका, टॉवर चौक अश्या वर्दळीच्या चौकात नेले. प्रथम वाहतूक शाखेकडे असलेल्या इंटरसेप्टर वाहन वेगमर्यादेचा भंग करणाऱ्या वाहनांवर कशी कारवाई करते, मद्य प्राशन केलेल्या, गडद काचे असलेल्या चारचाकी वर कशी कारवाई केल्या जाते, याचे प्रात्यक्षिक वाहतूक अंमलदार पंकज महाळानकार, ज्ञानेश्वर वारांनकार यांनी दाखविले. तसेच वाहतुक नियंत्रण करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले. आर एस पी चे विद्यार्थी उपलब्ध करून देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कुलचे शिक्षक थुटे, रत्नपारखी तसेच डी आर पाटील विद्यालयाचे शिक्षक नांदूरकर यांचे सहकार्य मिळाले.
अकोला पोलीस अधीक्षक जी श्रीधर व उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम यांचे मार्गदर्शनाखाली गजानन शेळके यांनी आर एस पी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा