Akola: उद्यापासून सात दिवस सुरू होणाऱ्या Lockdown साठी सुधारित निर्देश जारी




भारतीय अलंकार24

अकोला : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत अकोल्यात उद्यापासून 1 मार्च पर्यंत लागू असणाऱ्या लॉक डाउनसाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी काही नवीन निर्देश जारी केले आहेत. 


सुधारित निर्देश प्रमाणे अकोला , मूर्तिजापूर आणि अकोट या शहरामध्ये खालील नियमावली जारी केली आहे


१) खाद्य गृहे, रेस्टॉरंट सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत सुरू राहतील. तथापी अशा प्रतिष्ठान मधील किचन व खाद्य गृहे यांना फक्त घरपोच सेवा देण्यासाठी परवानगी राहील.


२) दुधाचे घरपोच वितरण सकाळी सहा ते आठ व सायंकाळी पाच ते सात राहील.


३) सर्व खाजगी व वैद्यकीय सेवा पशुचिकित्सक सेवा त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहतील.


४)  सर्व रुग्णालय व रुग्णालयाची निगडित सेवा त्यांच्या वेळेवर सुरू राहतील.


५) औषधांची दुकाने जी 24 तास सुरू ठेवण्याबाबत अनुज्ञेय आहेत ती दुकाने तसेच उर्वरित औषधांचे दुकाने सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत सुरू राहील.


६) अकोला शहरातील पाच पेट्रोल पंप सकाळी आठ ते तीन या कालावधीत सुरू राहील.. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील एक पेट्रोल पंप सुरू राहील. 


७) या संचार बंदीच्या काळात संपन्न होणाऱ्या पूर्वनियोजित परीक्षा या वेळेनुसार होणार.


८) कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठांची दुकाने कृषी प्रक्रिया उद्योग हे सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत सुरू राहील.


९)  मास विक्रीचे दुकान व अंडे विक्रीचे दुकान सकाळी आठ ते तीन वाजेपर्यंत सुरू राहील.

टिप्पण्या