Akola Lockdown: अकोला, मुर्तिजापूर व अकोट शहरात मंगळवार पासून सात दिवस संपूर्ण लॉकडाउन




भारतीय अलंकार24

अकोला : कोरोनाचा उद्रेक पाहता अकोला जिल्ह्यातील अकोला शहर ,मूर्तिजापूर शहर व अकोट शहर येथे  लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.  या तिन्ही शहरांमध्ये मंगळवार २३ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत लॉकडाऊन लागू केल्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज रविवारी केली.



Lockdown दरम्यान सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील. इतर सर्व दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक व नियंत्रणाची उपाययोजना म्हणून अमरावती विभागीय आयुक्तांनी प्रतिबंधात्मक क्षेत्र व इतर क्षेत्रासाठी लॉक डाऊन च्या निर्देशांची घोषणा केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला, मूर्तीजापूर, अकोट शहर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले. 



हे तीन शहर वगळता तालुक्यातील इतर गाव तसेच तेल्हारा,बाळापूर, बार्शीटाकळी, पातुर तालुक्यासाठी लॉकडाऊनचे वेगळे आदेश काढलेले आहे. त्यानुसार प्रतिबंधात्मक क्षेत्रातील सर्व प्रकारची दुकाने आणि प्रतिष्ठाने केवळ सकाळी ८ ते ३ वाजेपर्यंतच तर प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता इतर क्षेत्रासाठी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.



असे आहेत निर्देश

केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने , किराणा, औषधी ,स्वस्त धान्य दुकाने सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहतील .


इतर सर्व प्रकारची दुकाने संपूर्ण बंद राहणार आहेत ज्या उद्योगांना सुरू ठेवण्यासाठी यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे ते सर्व उद्योग सुरु ठेवण्याकरिता परवानगी राहील सर्व प्रकारची दुकाने आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू राहतील.


सर्व प्रकारची शासकीय कार्यालय, बँक १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील.



सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील.


लग्न समारंभा करता २५ व्यक्तींना वधू वरा सह परवानगी अनुज्ञेय राहील.


मालवाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. 


चार चाकी गाडी मध्ये चालका व्यतिरिक्त इतर तीन प्रवासी अनुज्ञेय राहतील. तीन चाकी गाडी उदाहरणार्थ ऑटोरिक्षा मध्ये चालका व्यतिरिक्त दोन प्रवासी दुचाकीवर हेल्मेट व मास्क सह दोन प्रवासी यांना परवानगी राहील.


आंतरजिल्हा बस वाहतूक करताना बस मधील असलेल्या एकूण प्रवासी क्षमतेच्या ५०% प्रवाशांसह सोशल डिस्टंसिंग आणि निर्जंतुकीकरण करून वाहतुकीकरिता परवानगी अनुज्ञेय राहील.


सर्व धार्मिक स्थळे ही एका वेळी दहा व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरु राहतील.


सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग,कोचिंग क्लासेस बंद राहणार आहे. 



सर्व प्रकारची सामाजिक राजकीय मनोरंजन शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन हे या कालावधीत बंद राहतील.

टिप्पण्या