VBA: नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे कोविड लसीकरण शुभारंभाचा उदोउदो करीत आहेत- प्रकाश आंबेडकर

VBA: Narendra Modi and Uddhav Thackeray are rumored to have launched Covid vaccine - Prakash Ambedkar


भारतीय अलंकार

अकोला : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड लसीकरणचा शुभारंभ केल्याचा उदोउदो करीत जुन्या काळात  शिकारी लोक असे ढोल बजावीत सर्व जंगलभर फिरत असत तसाच हा प्रकार सुरू आहे. देशात सुरू झालेल्या कोविड लसीकरण संदर्भात बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.


आज रविवारी अकोल्यात आमंत्रित पत्रकार परिषदेत ऍड.आंबेडकर बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम ही कोविड लस स्वत: ला का टोचून घेतली नाही, हे आधी जाहिर करावे असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. स्वतःला लस टोचून घेतली नाही हे आधी त्यांनी जाहीर करावे. स्वतःला लस टोचून न घेतल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात त्या लसीवर कसा विश्वास बसेल, असा सवालही आंबेडकर यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांनी ढोल वाजवत बसल्यापेक्षा कोविड लस स्वतः घेऊन सिरिन भरून जनतेसमोर त्यामधील औषध सुई बदलून टोचून घ्यावे. तरच सामान्य जनतेला विश्वास कोविड लसी बदलचा निर्माण होईल. अन्यथा त्या बॉटलमध्ये लस आहे किंवा नुसते पाणी आहे, याबाबत संभ्रम तयार होईल,असे देखील आंबेडकर म्हणाले.



WHO ने जाहीर केल्या प्रमाणे पंतप्रधानांनी इतर देशाच्या पंतप्रधान सारखे नियोजन करणे गरजेचे होते, परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे न करता मध्यमांसमोर मोठेपणाचे प्रदर्शनच मांडले असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. 



टिप्पण्या