Sport news: डोर्फ केटल केमिकल कंपनी पुन्हा एकदा कुस्तीपटूंच्या मदतीला धावली

कुस्तीगीर विजय पाटील याला राष्ट्रीय स्पर्धेसाठी विशेष मदतनिधी देताना संजय दुधाणे, शेजारी संदिप पठारे



नीलिमा शिंगणे-जगड

पुणे : मुंबई स्थित डोर्फ केटल केमिकल कंपनी पुन्हा एकदा कुस्तीपटूंच्या मदतीला धावली आहे. कंपनीच्या दत्तक खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल राष्ट्रीय पदक विजेते विजय पाटील, स्वाती शिंदे आणि नंदिनी साळुंके यांना डोर्फ केटल इंडिया प्रा. लि. कंपनीने तातडीने साठ हजारांची ऑनलाईन मदतनिधी पाठविला आहे.



राष्ट्रीय स्पर्धेसाठी नुकतीच पुण्यात निवड चाचणी स्पर्धा पडली. यात डोर्फ केटल कंपनीच्या आशियाई पदक विजेती स्वाती शिंदेसह राष्ट्रीय खेळाडू विजय पाटील व नंदिनी साळुंखेही निवड झाली. स्पर्धेच्या तयारीसाठी कंपनीच्या दत्तक खेळाडूंना विशेष मदत करावी अशी सूचना पत्रकार व लेखक संजय दुधाणे यांनी डोर्फ केटल केमिकल कंपनी सामाजिक उत्तरदायित्व विभाग प्रमुख संतोष जगधने यांच्याकडे केली. याची तातडीने दखल घेत कंपनीच्या तिन्ही खेळाडूंना प्रत्येकी वीस हजार असे एकूण साठ हजार रूपये ऑनलाईन पाठवले आहेत. 


विजय पाटील सध्या पुण्यात सह्याद्री क्रीडा संकुलात  तर स्वाती शिंदे आणि नंदिनी साळुंके कोल्हापूर मधील मुरकूड कुस्ती केंद्रात सराव करीत आहेत. गत राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेता विजय पाटीलला सह्याद्री क्रीडा संकुलात डोर्फ केटल केमिकल कंपनीच्या मदतीचे पत्र समन्वय संजय दुधाणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी  सह्याद्री क्रीडा संकुलाचे संस्थापक विजय बराटे, प्रशिक्षक संदिप पठारे उपस्थित होते.



डोर्फ केटल कंपनीने लॉकडाऊनच्या काळात देशभरातील देशभरातील ५०० मजूर कुटुंबियांना सलग तीन महिने रू. पाच हजारचे अर्थ सहाय्य केले होते. तसेच नागपूरमधील कबड्डीपटू शुभम बावणेलाही  मदतीचा हात दिला होता. 


डोर्फ केटल कंपनीचे सामाजिक उत्तरदायित्व विभाग प्रमुख संतोष जगधने याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की, अडचणीचा कालावधी सुरू असला तरी विजय पाटील, स्वाती शिंदे आणि नंदिनी साळुंके या गुणवत्ता खेळाडू विशेष मदत गरजीची होती. यामुळे खेळाडूंना खुराक व स्पर्धेच्या तयारीसाठी विशेष मदतनिधी देण्यात आला आहे. कोरोना काळात वीस हजार फूट पॅकेट तसेच पीपीई कीटचे कोरोना योद्धांना कंपनीने वाटप केले आहे.



डॉर्फ केटल केमिकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आपल्या सीएसआर मार्फतही राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्यासाठी भरीव मदत करते. जागतिक कुस्तीपटू रेश्मा माने,  ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला आर्चरी खेळाडू प्रविण जाधव यांच्यासह ८ खेळाडूंना डोर्फ केटलने दत्तक घेतले होते. सध्या आशियाई पदक विजेती कुस्तीगीर स्वाती शिंदे, राष्ट्रीय विजेता विजय पाटील यांच्यासह ४ खेळाडूंना कंपनीने दत्तक घेतले आहे.



टिप्पण्या