ShriRamTemple:जनतेच्या सहकार्याने अयोध्येत साकार होणार प्रभू रामाचे भव्य मंदिर

१५ जानेवारी ते १५ फेब्रवारीपर्यंत चालणार निधी समर्पण अभियान




भारतीय अलंकार

अकोला: पावन अयोध्येत प्रभू रामाचे जगातील आदित्विय राम मंदिर निर्माण होण्याचे आता पूर्ण होत असून, लाखो रामभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या मंदिराच्या भव्य निर्मितीसाठी श्री राम जन्म भूमी तीर्थक्षेत्राच्या वतीने १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत निधी समर्पण, गृह संपर्क अभियान आयोजित करण्यात येत असून, या माध्यमातून संपूर्ण विदर्भातील प्रत्येक कुटुंबाशी प्रत्यक्ष संपर्क साधून निधी समर्पण अभियान राबविण्यात येणार असून महीला पुरूष रामभक्तानी या उपक्रमास मोठ्या हृदयाने सहकार्य करण्याचे आवाहन विदर्भ प्रांत अभियान प्रमुख गोविंद शेंडे यांनी केले.



बी.आर हायस्कूल येथे विहिपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शेंडे यांनी या मासिक उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. रामजन्म भूमी नुकतीच लढा विहीपच्या वतीने गत १९८४ पासून सुरु करण्यात आला होता. तेव्हा श्रीराम जानकी रथ यात्रेने सबंध देशाला राम जन्मभूमी आंदोलनाशी जोडण्यात आले होते. 


अयोध्येत राम मंदिर व्हावे ही अस्मिता प्रत्येक भारतीयाने जोपासून सव्वा रुपया भूमीसाठी देत शीला पूजन केले. अखेर ९ नोव्हेबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने विवादित जागा ही रामजन्म भूमी आहे असा निवाडा देत मंदिर निर्माणचा मार्ग सुकर करीत श्रीरामजन्मभूमि तीर्थक्षेत्र हा न्यास बनविण्याचे शासनास निर्देश दिले. सबब रामजन्म तीर्थक्षेत्र या नावाने अधिकृत न्यास गठित करण्यात आला असून, त्या माध्यमातून संपूर्ण देशात निधी समर्पण व गृह संपर्क अभियान प्रारंभ करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



मंदिर निर्माण कार्य प्रारंभ झाले असून देशातील ख्यातनाम अभियंते व निर्माण कंपन्यांचे तज्ञ मंदिराचा आराखडा बनवीत असून दगडांचे हे मंदिर असून प्रत्येक मजला तीनशे साठ फुटांचा असणार आहे.प्रत्येक मजल्याची उंची २० फूट व लांबी ३६० फूट तथा रुंदी २३५ फूट राहणार असून यात सर्व आधुनिक व्यवस्था राहणार आहे.



निधी संपर्क अभियानात कार्यकर्ते प्रत्येक नागरिकांशी संपर्क करून निधी संकलित करणार आहेत.यात दहा रुपये,शंभर अथवा हजार रुपये संकलित करून तेवढ्या राशीचे कूपन व पावती देण्यात येणार आहे.या संदर्भात विदर्भ प्रांत समितीही गठित करण्यात आली आहे. समिती अध्यक्ष म्हणून देवनाथपिठेश्र्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज हे कामकाज बघणार असून अभियान प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 



समितीत अकोला महानगराचे अभियान प्रमुख म्हणून प्रकाश घोगलिया, सहप्रमुख रुपेश शाह, सुनील कुरहेकर तथा ग्रामीण अभियान प्रमुख म्हणून संजय रोहनकर, सह प्रमुख म्हणून सुनील जाधव, ज्ञानेश्वर देशपांडे, गजानन रेलकर आदी कामकाज बघणार आहेत. राम भक्तांनी या संपर्क व निधी संपर्क अभियानात सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


या पत्रकार परिषद मध्ये संघाचे विभाग संघचालक नरेंद्र देशपांडे, नगर संघचालक गोपाल खंडेलवाल, विहीपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढिया, महानगर अभियान प्रमुख प्रकाश घोगलिया, राहुल राठी, डॉ.प्रवीण चव्हाण, गणेश काळकर, सूरज भगेवार आदी उपस्थित होते.



टिप्पण्या