Shivsena: ठरलं तर! शिवसेना पश्चिम बंगालची निवडणूक लढणार…

                                      File photo



भारतीय अलंकार

मुंबई: शिवसेना पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन आज सायंकाळी घोषणा केली आहे. 


ट्विट

शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे असे संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर वर लिहुन,जाहीर केले आहे. 


आपली भेट लवकरच कोलकात्यात होईल असे देखील राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद करून,जय बंगाल असे बंगाली भाषेत लिहलं आहे. 


ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस हा पक्ष विरुद्ध भाजप अशी दुरंगी लढत या निवडणुकीत पाहण्यास मिळते आहे. आता या निवडणुकीत शिवसेनेनेही उडी घेतल्याने या रणधुमाळीत पुढे काय घडते  हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 


शिवसेना किती जागा लढवणार? उमेदवार कोण असतील हे अद्याप जाहीर केले नाही. मात्र, पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक शिवसेना लढवणार असल्याचे आज चित्र स्पष्ट झाले आहे. 

टिप्पण्या

  1. शिवसेना म्हणजे भाजपची बी टीम असल्यासारखी फक्त विरोधकांची मते खाण्याचे काम करील.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा