- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पुणे: देशाला कोरोनाची लस देणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या पुण्यातील नवीन बिल्डिंगला आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. आगीचे कारण अद्याप समोर आले नाही. या आगीत कोव्हीशिल्ड सुरक्षित आहे.
मांजरी भागात असलेल्या इमारतीत बीसीजी विभाग आहे. या भागात बीसीजी लस तयार करण्यात येते. कोरोना लसीचे संशोधन आणि उत्पादन विभाग या ठिकाणी नसल्याने काळजीचे करण नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, इतर लसीच्या उत्पादनावर या आगीमुळे काही परिणाम झाला का, हे अद्याप समोर आले नाही. सध्या ही आग मोठ्या प्रमाणात असल्याचे दूरवर पर्यंत दिसणाऱ्या धुरावरून स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे. अग्निशमन दलाच्या १० गाड्या रवाना झाल्या आहेत. दुपारी दीड-दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आग लागली त्या विभागात चार कर्मचारी अडकले होते.त्यापैकी तिघांची सुटका केली आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवीत हानी झालेली नाही,असे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.आगीचे कारण आद्यप समोर आले नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा