Republic Day: सलग पाच तास देशभक्तीपर गीत गायन करीत मेलोडीज ऑफ अकोला ग्रुपने साजरा केला संगीतमय प्रजासत्ताक दिवस

Melodies of Akola Group singing patriotic songs for five hours in a row




भारतीय अलंकार24

अकोला:  शहरातील मेलोडीज ऑफ अकोला या संगीत प्रेमी नागरिकांच्या समूहाने 72 वा प्रजासत्ताक दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला. सकाळी 7 वाजता पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत सलग देशभक्तीपर गीत गायन करून वातावरण देशभक्तीने भारावून टाकले.



शहरातील संगीतप्रेमी व्यापारी, डॉक्टर, प्राध्यापक, चार्टर्ड आकाऊंटंट, अधिकारी यांनी एकत्र येऊन आपला मेलोडीज ऑफ अकोला हा ग्रुप तयार केला आहे. हा समूह गीत गायनाच्या निमित्ताने एकत्र येत असतो. कारवोके पद्धतीचा वापर करून आपली संगीतकला सादर करीत असतो.  समूहातील एखादया सदस्याचा वाढदिवस असो की विवाह वर्षगाठ, कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्र येऊन प्रत्येक सदस्य आपली कला सादर करीत असतो. 26 जानेवारी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचे  या समूहाने ठरवून, सिव्हिल लाईन्स चौकात स्टेज उभारून सकाळी 7 ते 12 वा पर्यंत सतत 5 तास समूहाच्या सदस्यांनी देशभक्तीपर गीते गाऊन अनोख्या पद्धतीने संगीतमय प्रजासत्ताक दिवस साजरा केला. 


चौकात कोणतीही गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा होणार नाही व कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला.


उपजिल्हाधिकारी व पोलीस अधिकारी यांनी केले गायन

या कार्यक्रमाचे आकर्षण व वैशिष्ट्य म्हणजे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे व शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी सादर केलेली देशभक्तीपर गीते. दोन्ही अधिकाऱ्यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढून आपल्या  समूहाच्या कार्यक्रमात भाग घेऊन देशभक्ती पर गीते सादर केली. ज्याला उपस्थितांनी चांगली दाद दिली.

टिप्पण्या