Football: अकोल्यात आरीफ खान बाबाशेठ फुटबॉल टुर्नामेंटचे आयोजन ;२७ ते ३० जानेवारी कालावधीत रंगणार स्पर्धा

                                 photo: nilima



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला:  सामाजिक व क्रीडा कार्यात कार्यरत असणा-या यकजहेती सोशल वेलफेअर मल्टीपर्पज सोसायटीच्या वतीने व अकोला जिल्हा फुटबॉल असोसीएशन मार्गदर्शनात महानगरात अनेक वर्षाच्या नंतर आरीफ खान बाबासेठ फुटबॉल टुनर्मिंटचे आयोजन करण्यात आले आहे. लालबहाददुर शास्त्री स्टेडीयम येथे  २७ जानेवारी ते ३० जानेवारी पर्यंत चालणा-या या चार दिवसीय फुटबॉल स्पर्धेत  जिल्हयातील १० फुटबॉल चमू सहभागी होणार आहेत. 


क्रीडाप्रेमीसाठी अनेक वर्षानंतर फुटबॉल ची मेजवाणी होत असल्याची माहिती या स्पर्धेचे संयोजक आरीफ खान बाबासेठ यांनी दिली. शासकीय विश्रामगृहात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत या चार दिवशीच टूर्नामेंट ची माहिती देण्यात आली. 



यावेळी आयोजन समितीचे अब्दुल अजीज खान, ईशा खान, मिझा वसीम बेग, अहेमद तौसीर, मों. नवेद, जुनैद खान, सईद खान, ईलीयाज खान, इमान खान समवेत यकजहेती संस्थेचे अध्यक्ष आबीद खान, सचिव अब्दुल अजीज खान आदी उपस्थित होते.


२७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शास्त्री स्टेडीयम येथे या चार दिवसीय फुटबॉल टुर्नामेंटचा उद्घाटन सोहळा होत असुन यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, म.न.पा.अधिकारी व शहरातील अनेक मान्यवरांना निमंत्रीत केले आहे. या फुटबॉल स्पर्धेमध्ये जिल्हयातील बलाढ्य व अनुभवी आठ  आणि दोन नवोदित फुटबॉल चमु सहभागी होत असून, यामध्ये अकोला पोलीस, उस्मान आझाद फुटबॉल क्लब, युनिटी फुटबॉल क्लब, लोधी फुटबॉल क्लब, यंग बॉईज फुटबॉल क्लब, मॉर्निंग फुटबॉल क्लब, यंग ब्लड फुटबॉल क्लब, खान ईलेवन फुटबॉल क्लब, अंजुमन फुटबॉल क्लब तथा पॅरामाउंट फुटबॉल क्लबचा सहभाग राहणार आहे. 



या टुर्नामेंट मधील विजेत्या चार संघांना राज्यस्तरीय टुर्नामेंट मध्ये पाठविण्यात येणार असून, या टुनामेंट नंतर लवकरच राज्यस्तरीय फुटबॉल टुर्नामेंटचे आयोजनही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



या टुर्नामेंट मध्ये विजेत्या चमुला रोख पारितोषिक व ट्रॉफी बहाल करण्यात येणार असून बेस्ट गोलकीपर, बेस्ट डीफेन्डर, बेस्ट मिड फिल्डर, बेस्ट स्ट्राईगर, मॅन ऑफ द टुर्नार्मेट आदि वैयक्तिक बक्षिसांची लयलूट होणार आहे.  या  टुर्नामेंटची पंच कमिटी गठीत करण्यात आली असून यामध्ये चिफ रेफरी म्हणुन सईद खान यांच्या मार्गदर्शनात रेफरी जुनैद खान, अब्दुल अजीज खान, ईशाद खान जमादार, जवील हुसैन खान, मोहम्मद नवेत, जुनैद युसुफ खान, शोएब खान, अंन्जार अहेमद कुरेशी, ईर्शाद खान, शाहिद खान आदि कामकाज पाहणार आहत.


फुटबॉल क्रीडा प्रेमींनी  या चार दिवसीय फुटबॉल टुर्नामेंटचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.


टिप्पण्या