flood protection:पूरसंरक्षण भिंतीची माती खोदणा-यावर कारवाई करावी- मदन भरगड

Action should be taken to dig the soil of flood protection wall - Madan Bhargad



भारतीय अलंकार

अकोला: गीतानगर परिसरातील विवेकानंद आश्रम मागील पूरसंरक्षण भिंतीची माती खोदणा-यावर कारवाई करावी,या मागणीचे निवेदन माजी महापौर मदन भरगड यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे आज दिले.



मोर्णा नदीला पूर आल्यास पुराच्या पाण्याचा गीतानगर भागात शिरकाव होत होता. यासाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून पूरसंरक्षण भिंत बांधली. परंतू, सध्या येथील पूरसंरक्षण भिंतीची माती जेसीबीने खोदून इतरत्र नेण्यात येत आहे. यामुळे ही पूरसंरक्षणभिंत कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही भिंत पडल्यास गीतानगर भागातील नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे, तरी याप्रकरणी आपण त्वरित जेसीबीने माती खोदणा-यावर कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.                       


या निवेदनाच्या प्रतिलिपी कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, मनपा आयुक्त,जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे देखील सोपविण्यात आल्या आहेत.



टिप्पण्या