Election update:अकोला:ग्रामपंचायत: अमोल मिटकरी पॅनलला कुटासात ११ जागा; तर भाजपा प्रवक्ते गिरीश जोशी यांचा जिल्ह्यात सत्ता प्राप्तीचा दावा

राजकारण:गल्ली ते दिल्ली




नीलिमा शिंगणे-जगड

अकोला : राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कुटासा मूळगावी मिटकरी पॅनलची बाजी १३ पैकी ११ जागा मिळवून केला विजय प्राप्त. अन्य पॅनलला ४ जागा. कुटासा येथे भाजप आणि काँग्रेसची होती युती, तर राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढली होती. 11 मिटकरी, तर 2 काँग्रेस - भाजप



भाजपाची विजयी घोडदौड


अकोला जिल्हा ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सतराशे 41 जागांपैकी भारतीय जनता पक्षाला 545 जागा आतापर्यंत प्राप्त झाली आहे. जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर,  आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार गोवर्धन शर्मा ,आमदार हरीश पिंपळे ,तेजराव थोरात व तालुकाध्यक्ष यांच्या नेतृत्वात व विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाला नेत्रदीपक विजय प्राप्त करून दिले. 


सत्ता प्राप्तीचा गिरीश जोशींचा दावा


अकोला जिल्ह्यातील सतराशे 42 ग्रामपंचायत निवडणूक पैकी भारतीय जनता पक्ष 50 टक्के पेक्षा जास्त ठिकाणी विजय प्राप्त करून सत्ता प्राप्त करण्यात यश प्राप्त केला असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते गिरीश जोशी यांनी केला आहे. 


भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय राज्यमंत्री  संजय धोत्रे, जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे ,आमदार हरीश पिंपळे आमदार गोवर्धन शर्मा महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल तेजराव थोरात व विविध आघाडीचे पदाधिकारी तालुका अध्यक्ष बुथ प्रमुख शक्ती केंद्रप्रमुख यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाने नेत्रदीपक विजय प्राप्त केला आहे. अकोला जिल्ह्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षावर जनतेने विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' या कार्यक्रमांतर्गत जनतेने विश्वास व्यक्त केला.  


केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय धोत्रे यांची जनतेविषयी असलेली आपुलकी सद्भावना व विकासाचा सूत्र जनतेनी स्वीकारलेला आहे. जिल्हा भाजपाचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांच्या कुशल नेतृत्वावर जनतेने विश्वास व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विजय प्राप्त करून अकोला जिल्ह्यात बहुमत मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्ष अनेक ग्रामपंचायत मध्ये किंग मेकर च्या भूमिकेमध्ये असल्यामुळे भारतीय जनता पक्ष पळसो बढे, चिखलगाव, निमकर्दा, भांबेरी, चोहट्टा बाजार,  उरळ, शिनखेड, लोहगड, टिटवाभटोरी, नागपुरी, शिरपूर, जामठी, आलेगाव सारख्या ग्रामपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय प्राप्त केला असल्याचे जोशी यांनी सांगितले.


विजेत्यांचे स्वागत


भारतीय जनता पक्ष कार्यालयात विजयी उमेदवार मोठ्या संख्येने येत असून, त्यांचे स्वागत जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, तेजराव थोरात व भाजपाचे पदाधिकारी करीत असून जल्लोषाचा वातावरण भारतीय जनता पार्टी कार्यालय कार्यात सातत्याने दिवसभर सुरू होता.



दहीहंडा ग्रामपंचायत भाजप समर्थित बारा सदस्यांपैकी 10 चा विजय.



बार्शीटाकळी तालुका येथील लोहगड ग्रामपंचायत वर भाजपचा झेंडा 09 पैकी 09 जागी भाजपचा विजय.

टिप्पण्या