- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
File photo
भारतीय अलंकार
अकोला: ग्रामपंचायत निवडणूक २०२०-२१ ची मतमोजणी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील शासकीय गोदामामध्ये सोमवार १८ जानेवारी रोजी सकाळी सात वाजता पासून सुरु होणार आहे. मतमोजणीच्या वेळी या ठिकाणी कोणताही अनूचित प्रकार घडू नये याकरीता एचडीएफसी बँक ते सरकारी बगीच्या रोड वरील सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार, सोमवार १८ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत अशोक वाटीका चौक - मेन हॉस्पीटल- एचडीएफसी चौक - सरकारी बगीच्याकडे जाणारी वाहतूक तसेच येणारी वाहतूक अशोक वाटीका चौक - मेन हॉस्पीटल- बँक चौक - पंचायत समिती चौक - तहसिल कार्यालय - बालाजी मॉल - खोलेश्वर रोड मार्ग सरकारी बगीच्याकडे या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
तसेच लग्झरी स्टँड-सरकारी बगीच्या - बँक चौक - अशोक वाटीका चौक जाणारी व येणारी वाहतूक लग्झरी स्टँड - भगतसिंग चौक - अशोक वाटीका चौक किवा लग्झरी स्टँड - सरकारी बगीच्या - खोलेश्वर रोड - बालाजी मॉल - तहसिल कार्यालय - पंचायत समिती कार्यालय - बँक चौक - अशोक वाटीका चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
महाराणा प्रताप चौक - एसपी ऑफीस - बँक चौक - अशोक वाटीका चौककडे जाणारी व येणारी वाहतूक महाराणा प्रताप चौक - रिर्जव माता मंदिर - पंचायत समिती - बँक चौक - अशोक वाटीका चौक या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे,असे आदेशात नमूद केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा