- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
corona vaccination सावधान: कोरोना लसीकरण नावाखाली वरिष्ठ नागरिकांची फसवणूक;वैयक्तिक माहिती कुणाला देवू नये...
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
file photo
Caution: Fraud of senior citizens under the name of corona vaccination
नवी दिल्ली: देशात कोरोना बचावासाठी लसीकरण अभियान १६ जानेवारी पासून सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सला वॅक्सिन देण्यात येत आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यात वरिष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे. यादरम्यान केंद्र सरकारने कोविड-19 लसीकरणाच्या नावाने फसवणूक करणाऱ्यांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
जेष्ठ नागरिकांना आवाहन
पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून असल्याचा दावा काही लोकांकडून करण्यात येत आहे. हे फसवणूक करणारे लोक वरिष्ठ नागरिकांना कोरोना लस देण्यासाठी त्यांना कॉल करतात आणि आधार कार्ड, ओटीपीसारखी माहिती त्यांच्याकडून मागतात. मात्र, हा फसवणूकीचा प्रकार आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाच्या नावाने आलेल्या कोणत्याही कॉलवर तुमचा आधार कार्ड आणि ओटीपी नंबर शेअर करू नका, असे आवाहन केले आहे.
आतापर्यंत १५ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. शनिवारपर्यंत १५,३७,१९० लोकांना लस दिली गेली आहे. वरिष्ठ नागरिकांना लस कधी देण्यात येईल. याबाबत सरकारने कोणतीही माहिती दिलेली नाही. परंतू, Co-WIN वर लसीसाठी आपण आपले रजिस्ट्रेशन करू शकता. Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्टसारख्या कागदपत्रांची गरज असते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा