- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
File photo
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: काही दिवसांपासून राज्यात थंडीला चांगली सुरवात झाली होती. मात्र, चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, मुंबईसह राज्यात इतर जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. अकोल्यातही आज सोमवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. या वातावरणामुळे हिवाळ्यात पावसाळा सुरू झाला की काय, अश्या प्रकारच्या प्रतिक्रिया अकोलेकरांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, प्रादेशिक मौसम केंद्र, मौसम विज्ञान विभाग, नागपूर यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार, अकोला जिल्ह्यात ४ ते ८ जानेवारी या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाचे पर्जन्यमान होण्याची शक्यता वर्तवली आहे.
यासंदर्भात प्रशासनामार्फत जिल्ह्यातील गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. क्षेत्रिय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक संबंधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायक आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी मुख्यालयी उपस्थित राहून दक्षता घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
आज अकोला शहरसह ग्रामीण भागात रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने पावसाने शेती आणि पिकाचे नुकसान झाल्याचे अंदाज बांधले जात आहे. या पावसाने तूर आणि हरभरा पिकांना मोठा फटका बसण्याची चिन्ह आहे. उशिरा लागवड केलेल्या फुलोरा अवस्थेत असलेल्या तूर आणि हरभरा पिकांसाठी हा पाऊस नुकसानदायी असल्याचे तज्ञाचे म्हणणे आहे.
उत्तर भारतात अनेक ठिकाणी पाऊस झाला. दिल्लीत विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यातही ४ ते ८ जानेवारी रोजी कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या व मध्यम सरींच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. दरम्यान, हवामानात झालेल्या बदलामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत, कोरोना नियमाचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा