Akola Police: नियम न पाळणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांवर कारवाईचा धडाका; पहिल्याच दिवशी ४० वाहन कार्यालयात जमा

Akola Police: Action against autorickshaw drivers for not following the rules;  40 vehicles deposited in the office on the first day





नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून अकोला शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरात धावणाऱ्या वाहतूकीचे नियम न पाळणाऱ्या बेशिस्त ऑटोरिक्षा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच ४० ऑटोरिक्षा कार्यालयात जमा करण्यात आल्या.


शहरात क्षमतेपेक्षा जास्त ऑटोरिक्षा



शहरात आवश्यकता आणि रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त ऑटोरिक्षा धावतात. मोठ्या संख्येने धावणाऱ्या ऑटोरिक्षामुळे  वाहतुकीवर खूप ताण पडत आहे. त्यातच निर्माणधीन रस्ते, उड्डाणपूल  यामुळे रस्त्यांची खस्ता हालत झाल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्याचा अधिकचा ताण वाहतूक पोलिसांवर दिवसभर असतो. 



धडक मोहिमेला प्रारंभ


यासाठी रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून, शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी अकोला शहरातील ऑटोरिक्षा चालकांना वाहतूक नियम पाळण्याविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले. तसेच स्ट्रीट मीटिंगच्या माध्यमातून प्रथम प्रबोधन केले. परंतु फक्त प्रबोधन करून न थांबता वाहतूक नियमांचे भंग करणारे, रस्त्यात कोठेही ऑटोरिक्षा थांबवून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे, दंडात्मक कारवाईची रक्कम बाकी ठेवणारे ऑटोरिक्षा चालकांचे वाहन पकडून कार्यालयात जमा  धडक मोहीम आज २३ जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे.


४० ऑटोरिक्षा जमा

मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ४० ऑटो वाहतूक कार्यालयात जमा करण्यात आले. लावलेल्या ऑटोच्या चालकांना एकत्रित करून त्यांना वाहतुकीचे नियम पाळण्याची तंबी देण्यात आली. तसेच चलान बाकी असलेल्या ऑटो चालकाकडून दंडाची पूर्ण रक्कम भरून घेण्यात आली.  दंड न भरणारे ऑटो  वाहतूक कार्यालयात थांबवून ठेवण्यात आले.



"यापुढे देखील बेशिस्त व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांचे ऑटो वाहतूक कार्यालयात जप्त करून त्यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. ही मोहीम सुरूच राहणार आहे."


गजानन शेळके

शहर वाहतूक 

पोलीस निरीक्षक 

अकोला 



टिप्पण्या