Advocates Council: वकिलांना इन्शुरन्स स्कीम सुरू करावी-अधिवक्ता परिषदेची मागणी



नीलिमा शिंगणे-जगड

अकोला: अखिल भारतीय अधिवक्ता परिषद अकोला जिल्ह्याच्या वतीने आज  जिल्हाधिकारी अकोला यांना वकील व त्यांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स स्कीम लागू करण्यात यावी, याकरिता निवेदन देण्यात आले.  निवेदन उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्वीकारले.



अखिल भारतीय अधिवक्ता परिषद राष्ट्रीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. त्या अनुषंगाने आज अखिल भारतीय अधिवक्ता परिषद अकोला जिल्हाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अधिवक्ता  सत्यनारायण जोशी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. 



याप्रसंगी अधिवक्ता सत्यनारायण जोशी यांनी केंद्र सरकारच्या वतीने वकिलां करिता अनेक योजना असून, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे, परंतू वकिलांना पीएफ स्कीम लागू नसून, या कोविडच्या काळात वकिलांना अनेक कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला.



याकरिता न्याय मंत्री भारत सरकार यांनी या बाबीकडे लक्ष देऊन सर्व वकील वर्ग व त्यांच्या कुटुंबीय यांच्या करिता इन्शुरन्स स्कीम लागू करण्यात यावी व सर्व वकीलाना न्याय करावा, अशा स्वरूपाचे प्रतिपादन केले.


याप्रसंगी अधिवक्ता परिषदेचे जिल्हामंत्री भूषण काळे ,किरण खोत अकोला बार असोसिएशन अध्यक्ष आनंद गोदे, राजेश्वर देशपांडे, विजय भांबेरे, देवाशिष काकड, परेश सोळंकी, आशिष फुंडकर, प्रवीण राठी, भारती रुंगठा, सागर जोशी, सागर डवले हे प्रामुख्याने हजर होते.

टिप्पण्या