- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ठळक मुद्दे
*आमदार गोपीकिसन बाजोरिया आणि आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीमध्ये ह भ प लांडे महाराज यांचे हस्ते फळाचा रस घेऊन उपोषण केले स्थगित
*मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट करून मागणी मंजूर करून घेण्याचे आश्वासन
*वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा दिंडीसह पाठींबा.
भारतीय अलंकार
अकोला: विश्व वारकरी सेना, वारकरी साहित्य परिषद, वारकरी क्रांती सेना व वारकरी महामंडळ यांच्या पुढाकाराने विश्व वारकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी 2 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर धार्मिक कार्यक्रमासाठी 100 भाविकांना कोरोना च्या संबंधी अटीव शर्त लावून परवानगी देण्यात यावी, यासाठी आमरण उपोषण सुरू केले होते. या काळात 4 बैठका अकोला जिल्हाधिकारी यांच्या सोबत निष्फळ ठरल्या. मात्र, आज आठव्या दिवशी राज्यातील सत्तेतील शिवसेना आमदार गोपिकीसन बाजोरिया आणि विरोधी पक्षाचे असलेले भाजपा आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हभप लांडे महाराज यांच्या हस्ते फळाचा रस घेवून उपोषण स्थगित करण्यात आले.
यावेळी आमदार बाजोरिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सोबत प्रत्यक्ष भेट करून देऊन मागणी मंजूर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तर आमदार रणधीर सावरकर यांनी येत्या 14 आणि 15 डिसेंबर रोजी होत असलेल्या विधिमंडळ च्या अधिवेशनात मागणी लावून धरली जाणार असल्याचे आश्वासन दिल्याने, आश्वासनावर विश्वास ठेवून अखेर आठव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे उपोषणकर्ते गणेश महाराज शेटे यांनी जाहीर केले.
यांनी दिली भेट
यावेळी माजी आमदार नारायण गव्हाणकर , माजी मंत्री गुलाबराव गावंडे, जी प अध्यक्ष प्रतिभा भोजने, माजी जी प अध्यक्षा पुष्पा इंगळे, उपाध्यक्ष राठोड , गजानन गवई, ह भ प महादेव निमकांडे महाराज, वासुदेव महाराज खोले, प्रबोधनकार सत्यपाल महाराज, संदीपपाल महाराज , ह भ प गजानन महाराज दहिकर, गजानन महाराज हिरुळकर, रविंद्र महाराज केंद्रे, श्रीधर महाराज आवारे, तुलसीदास महाराज मसने,शिवा महाराज मावस्कर, राजू महाराज कोकाटे, विठ्ठल महाराज चौधरी, देविदास महाराज निखारे, विठ्ठल महाराज खापरकर, ज्ञानेश्वर महाराज , गजानन महाराज ऐरोकर, गजानन महाराज गावंडे, योगेश महाराज तांबडे, दिनेश महाराज भामदरे, सोपान महाराज काळूनसे, शिवहरी महाराज इस्तापे, गोवर्धन महाराज भाकरे, विठ्ठल महाराज महल्ले आदींनी आज भेट दिली.
वंचितचा दिंडीसह पाठींबा
विश्व वारकरी सेनेच्या उपोषणाला आज वंचित बहूजन आघाडीच्या पदाधिकारी यांनी दिंडी काढून पाठिंबा दिला.
दिंडीत आज प्रदेश प्रवक्ता तथा युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभा भोजने, जिल्हा परिषद उपाध्यक्षा सावित्री राठोड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा पुष्पा इंगळे, सभापती सुशांत पाटील बोर्डे, जि प सदस्या प्रगती दांदळे, जि प सदस्या प्रमोदिनी कोल्हे,जिल्हा परिषद सदस्य अनंत अवचार, गजानन गवई , सचिन शिराळे, अजय पातोडे, निक्की डोंगरे सहभागी झाले होते. यानंतर उपोषण स्थळी जाऊन कीर्तन मध्ये सहभागी होऊन फुगडी घातली. गणेश महाराज शेटे व ह भ प साबळे महाराज यांनी वंचितच्या पदाधिकाऱ्यांचे दिंडीसह सहभागाबद्दल अभिनंदन केले.
आमदार शर्मा यांची भेट
अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी सुद्धा उपोषण मंडपास भेट देऊन श्रीरामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने विश्व वारकरी सेनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा