UrmilaMatondkar: बाल कलाकार ते शिवसैनिक: उर्मिला मातोंडकर अखेर शिवबंधनात अडकल्या...

Urmila Matondkar finally got stuck in Shivbandhan




भारतीय अलंकार

मुंबई: चंदेरी सृष्टीतील अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी अखेर आज शिवबंधन बांधून शिवसेना राजकीय पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधून नव्या राजकीय जीवनाची खऱ्या अर्थाने सुरुवात केली.



जाहीर प्रवेश


यापूर्वी कॉंग्रेस कडून मातोंडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. सध्या  विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकर यांचे नाव महाविकास आघाडी सरकारने पाठवले आहे. त्यांची नियुक्ती जवळपास निश्चित मानली जात आहे. नियुक्ती घोषित होण्यापूर्वीच मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.



२०१९ मध्ये पराभव

                                      file photo

उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. वर्षभर राजकारणा पासून  दूर असलेल्या उर्मिला मातोंडकर यांनी आज दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात प्रवेश केला.



बाल कलाकार ते शिवसैनिक

                                      file photo


ऊर्मिला मातोंडकर यांनी १९९० दशक बॉलीवूड गाजविले. हिंदी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. मराठी भाषिक कुटुंबात जन्मलेल्या ऊर्मिला यांनी हिंदी,मराठी चित्रपटात बाल कलाकार म्हणून भूमिका केल्या.विशेषतः मासूम चित्रपटातील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यानंतर १९९१ साली पडद्यावर झळकलेल्या नरसिंहा या हिंदी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. १९९५ मध्ये प्रदर्शित रंगीला चित्रपटाने त्यांना अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. जुदाई (इ.स. १९९७) आणि सत्या (इ.स. १९९८) हे चित्रपट सुध्दा लोकप्रिय ठरले. त्यांनी हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत.





टिप्पण्या