TMKOC: 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेचे लेखक अभिषेक मकवानाची आत्महत्या; 'ऑनलाईन इझी लोन' चा बळी!

अभिषेकला सतत ब्लॅकमेल केले जात असल्याचा दावा त्याच्या कुटूंबायांनी केला आहे. 

                                      file photo



भारतीय अलंकार

मुंबई:  सर्वाधिक लोकप्रिय विनोदी टीव्ही मालिका 'तारक मेहता का उलटा चश्मा' चे लेखक अभिषेक मकवाना यांनी आत्महत्या केली असल्याचे उघडकीस आले आहे. मिलियन ट्रिलीयन लोकांना हसविणार अभिषेकने मात्र,ताणावात येवून आत्महत्या करावी, ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना आणि कुटुंबियांना न पटणारी आहे. अभिषेकला सतत ब्लॅकमेल केले जात असल्याचा दावा त्याच्या कुटूंबायांनी केला आहे. 




सुसाईड नोटबद्दल बोलतांना पोलिसांनी सांगितले की, आर्थिक तणावातून आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शीनी वाटते. तर, ब्लॅकमेल आणि सायबर फसवणुकीचा बळी ठरल्याचा आरोप अभिषेकच्या कुटुंबीयांनी केला आहे. अभिषेकच्या निधनानंतर, फसवणूक करणाऱ्यांकडून  कुटुंबाला कॉल येत आहेत. कारण तो कर्जात हमीकर्ता असल्याने कुटुंबाला सर्व पैसे परत देण्याची मागणी केली जात आहे.




माझ्या भावाने इझी लोन ऍप्स मधून छोटे कर्ज घेतले होते. ते खूप जास्त व्याज दर आकारत होते. परंतु, मी त्याचा व्यवहार तपासला असता, मला आढळले की, ते माझ्या भावाला सातत्याने काही पैसे पाठवत आहे, पण माझा भावाने कोणत्याही  कर्जासाठी अर्ज केलेला नाही, या कर्जावरील व्याज ३० टक्के होते,असे अभिषेकचा भाऊ जेनिस याने पोलिसांना सांगितले असल्याचे कळते.




मुंबईतील चारकोप पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुटुंबियांनी पोलिसांना फोन नंबर दिले आहेत. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली असून, बँकांच्या व्यवहारांची चौकशी करीत आहेत. 




इझी लोन (कर्ज) देण्यासाठी आजकाल SMS, ई-मेल,कॉल येतात. मात्र, नागरिकांनी अश्या ऑनलाईन इझी लोन पासून सावधान राहावे.अधिकृत बँकेतूनच कर्ज घ्यावे तसेच खासगी लोन देणाऱ्या कंपनीची चौकशी करूनच व्यवहार करावा,असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


टिप्पण्या